उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात, शेतकरी संघटना यंदाही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात, शेतकरी संघटना यंदाही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना प्रतिनिधींची आज महत्त्वपूर्ण बैठक.

  • Share this:

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 17 नोव्हेंबर: राज्यातल्या काही भागात उसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र शेतकरी संघटना यंदाही आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.  त्यामुळेच आज कोल्हापूरमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात ही बैठक होणार आहे. शनिवारी म्हणजेच शनिवारी कोल्हापूरमध्ये साखर कारखानदारांची एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये समन्वयाने निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.

शासकीय सभागृहात सकाळी 11 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये जो निर्णय घेण्यात येईल तो राज्यभर लागू करण्यात येणार आहे. राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील बैठकीला येणार की ते प्रतिनिधी पाठवणार याकडेहरी सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला होता. ऊसाचं नुकसान झाल्यामुळे यंदा कारखानदारांकडे येणारा ऊसाचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेमकं काय ठरणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे येत्या शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणार आहे. त्यातच काही ठिकाणी स्वाभिमानीने आंदोलनही सुरू केलं तर अनेक साखर कारखान्यांना गाळप परवानाही मिळालेला नाही. तसंच महापुरामुळे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.

First Published: Nov 17, 2019 09:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading