Home /News /maharashtra /

'हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला, आता काय करायचं?'

'हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला, आता काय करायचं?'

गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय.

सोलपूर 01 मार्च : सोलापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका ज्वारी, गहू, हरभऱ्यासह द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांना बसलाय. सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसलाय. मध्यरात्री झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावातील जाधव कुटुंबीयांच्या द्राक्षबागेला मोठा फटका बसलाय. काढणीला आलेल्या द्राक्षाच्या घडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेय. यामुळे द्राक्ष घडात फंगस तयार होण्याची शक्यता आहे.  पावसामुळे मोठ्या प्रमाणात काढलेल्या ज्वारीचे पीक काळे पडणार असून कडबा ही काळा पडलाय. उन्हाळ्याचे दिवस असल्याने द्राक्षाचे मणी तडकण्याची शक्यता आहे. यावर्षी शेती द्राक्ष पिकाला चांगला दर मिळेल अशी परिस्थिती होती मात्र अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. नुकसान पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हातातोंडाशी आलेला घासही गेलाय, आता कारायचं काय असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’, शिवसेनेची सडकून टीका 8 जिल्ह्यांना फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. अवकाळी पावसाचा ज्वारी गहू, हरभरा याबरोबरच फळ पिकांमध्ये आंबा, द्राक्ष, टरबुज यासारखा शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बीड शहरात आज दुपारीच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसंच हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिल्ली हिंसाचारानंतर आता मुंबईतही कलम 144 लागू यामध्ये ज्वारी गहू हरभरा या बरोबरच फळ पिकांमध्ये आंबा,द्राक्ष टरबुज या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षी रब्बीचा पीक विमा मिळणार नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक आक्रमक कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने हजरी लावली. गडहिंग्लज, आजरा शहरात चांगलाच पाऊस बरसला. पावसाचा आठवडी बाजारावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. ज्वारी, बटाटा या पिकांसह आंबा, काजूच्या उत्पादनावरही या अवकाळी पावसाचा परिणाम आहे. सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बेळगावसह सीमाभागातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Maharashtra rain

पुढील बातम्या