भाजपमध्ये असंतोष उफाळला, काँग्रेसमधून आलेला बडा नेता निशाण्यावर

भाजपमध्ये असंतोष उफाळला, काँग्रेसमधून आलेला बडा नेता निशाण्यावर

'विखे पाटलांनी भाजपच्याच उमेदवारांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवारांना रसद पुरवली आणि खतपाणी घातलं.'

  • Share this:

मुंबई 28 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजपने राज्यातल्या प्रत्येक विभागाचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. मुंबईतल्या भाजपच्या मुख्यालयात प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्यासह श्रेष्ठ नेते हा आढावा घेत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातल्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आदी नेते बैठकीला उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंद आणि शिवाजी कर्डिले यांनी पराभवासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांना जबाबदार धरले. त्यांच्यावर करावाई झाल्याशीवाय आम्हाला समाधान होणार नाही असंही ते म्हणाले.

माजी मंत्री राम शिंदे यांचे विखे पिता पुत्रांबाबत हे आक्षेप घेतले आहेत.

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत विखे पाटीलांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केलं असा राम शिंदे यांचा आक्षेप आहे. भाषणात समोरच्या उमेदवाराला मदत होईल अशी वक्तव्य त्यांनी केलीत. उदाहरणार्थ भाषणात विरोध घडाळ्याला, उमेदवाराला नाही असं विखेंनी म्हटलंय. विखे पाटीलांचे कार्यकर्ते प्रचारावेळी राम शिंदेंच्या व्यासपीठावर पण सुजय विखे आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाजुने मदतीला होते.

आदित्य ठाकरेंनी साधला अमृता फडणवीसांवर निशाणा

शिंदे विरोधकांच्या ऐन निवडणुकी दरम्यान भेटीगाठी घेणं यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, त्यातून शिंदेंच्या मतांवर परिणाम झाला. भाजपात प्रवेश घेतल्यानंतही पक्षात न मिसळता स्वत:चा वेगळा गट करत कंपूशाही करणं आणि शिंदे यांचा पराभव होईल अशी व्यवस्था करणं. अशी कारणे राम शिंदे यांनी सांगितली.

अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांबाबत केला खुलासा, शिवसेनेलाही दिले प्रत्युत्तर

तर शिवाजीराव कर्डिले म्हणाले, माझी विखे पाटीलांबद्दलची नाराजी अजूनही कायम आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझी नाराजी कायम राहील. तसेच आम्ही अहमदनगर मनपात जशी जादूची कांडी फिरवली होती तशी आम्ही जिल्हा परिषदेत फिरवू असं देखील कर्डिले यांनी म्हटलंय. राज्यात आमची सत्ता आली असती तर विखे यांच्या पत्नी भाजपात आल्या असत्या असा टोला कर्डिले यांनी लगावलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या