भाजपमध्येही बंडखोरीची लागण, या दिग्गज मंत्र्यांची डोकेदुखी वाढणार!

भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदे यांना त्यांच्याच एका सहकाऱ्याने आव्हान दिलंय. निवडणूक लढण्याचे संकेतही त्यांने दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 09:38 PM IST

भाजपमध्येही बंडखोरीची लागण, या दिग्गज मंत्र्यांची डोकेदुखी वाढणार!

साहेबराव कोकणे, अहमदनगर 9 सप्टेंबर :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मंत्री राम शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. मेळावा घेण्याआधी राऊत यांनी कर्जत शहरात मोठी रॅली काढली. रॅलीला आणि मेळाव्याला राऊत सर्थकांनी मोठा प्रतिसाद दिला. रॅली नंतर झालेल्या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी राऊत यांनी निवडणूकिला उभा राहण्याचा आग्रह केला. राऊत यांनी देखील आपल्या भाषणात राम शिंदे यांच्यावर अनेक आरोप करत शिंदे यांना मदतीची जाणीव नसल्याचं म्हटलं असून येत्या आठ दिवसात निवडणूक लढवण्या संबंधीचा निर्णय घेणार असल्यासाचं सांगितलं.

कर्जत तालुक्यात राऊत यांचा मोठा जनसंपर्क आहे. गेल्या निवडणूक राम शिंदे यांना राऊत यांच्या मदतीमुळे कर्जत तालुक्यात चांगलं मताधिक्य मिळालं होतं असा त्यांचा दावा आहे. या निवडणुकीत राम शिंदे यांच्या समोर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच आव्हान आहे अशात राऊत यांनी निवडणुकीला उभं राहण्याच निश्चित केल तर राम शिंदे यांच्या समोर अडचणीत वाढ होणार आहे.

( वाचा : Alert : आता दक्षिणेतून होऊ शकतो दहशतवादी हल्ला, लष्कराला मिळाली ही गुप्त माहिती )

मुख्यमंत्री फडणवीस हेच शिवाजी महाराजांचे खरे वारसदार

विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत असं मत रासपचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज नातेपुते येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोलापूर जिल्ह्यातल्या चार जागा मागणार असल्याचं सांगून या जागांवर तयारी करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत.

Loading...

( वाचा :VIDEO : रामदास कदम बंगाली बाबांना घेऊन फिरतात, सेनेच्याच नेत्याचा आरोप)

भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटप मध्ये सरकार सोबत असलेल्या शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी 18 जागा देण्याचं ठरलं असल्याचं जानकर यांनी सांगितलं. रासपची शक्ती वाढल्यामुळे घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ आपण असणार असे संकेतही जानकर यांनी दिलेत.

( वाचा : मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका! )

ते पुढे म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले माझे कायमच मोठे भाऊ राहिले आहेत तरी राज्यात रासपची वाढलेली सत्तेतील भागीदारी जिल्हा परिषद ,पंचायत समित्या, नगरपरिषद यामध्ये वाढलेल्या बळामुळे 18मधल्या दहा ते बारा जागा लढवणार आहे. 2014मध्ये काहीही नसताना सहा जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्यामुळे आता 12 जागा असणार आहे असंही त्यांनी सांगितलं. यामुळे आता घटक पक्षांमध्ये रासप मोठा भाऊ अशी चर्चा आता सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 09:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...