उजनी धरण 102 टक्के भरले ! धरणातून 66 हजार क्युसेकचा विसर्ग

उजनी धरण 102 टक्के भरले ! धरणातून 66 हजार क्युसेकचा विसर्ग

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायी समजले जाणारे उजनी धरण ऑगस्ट महिन्यातच तुंडूब भरलंय. गुरूवारी दुपारी 4 वाजता धरणातला पाणीसाठा तब्बल 102 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने धरणातून सध्या 66.50 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.

  • Share this:

इंदापूर, 31 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायी समजले जाणारे उजनी धरण ऑगस्ट महिन्यातच तुंडूब भरलंय. गुरूवारी दुपारी 4 वाजता धरणातला पाणीसाठा तब्बल 102 टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने धरणातून सध्या 66.50 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्राच्या घाटमाथ्यावर 25 ऑगस्टपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणं आत्ताच भरलीत. त्यामुळे जास्तीचं पाणी धरणांच्या सांडव्यामधून नदीपात्रात मोठया प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आलेले आहे, हे सर्व पाणी दौंड येथून उजनी धरणामध्ये जमा होतंय. त्यामुळेच यावर्षी वेळेआधीच उजनी धरण 100 टक्क्यांवर जाऊन पोहचलंय. उजनी धरणाची एकूण क्षमता 117 टीएमसी असून धरणात साधारणतः 113 टक्क्यांपर्यंत जलसाठा करता येतो. त्यामुळे आणखी पाऊस पडला तर भीमा नदीकाठच्या गावांना धोका संभवतो. म्हणूनच जलसंपदा विभागाला आत्तापासून पाणी सोडण्याचं व्यवस्थित नियोजन करावं लागणार आहे.

उजनी धरणाच्या ४१ मोऱ्यांपैकी १५ मोऱ्यांमधून 66,500 हजार क्यूसेकने पाणी भिमा नदीत सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या लोकांना आत्तापासूनच सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, सीना माढा बोगद्यातून ९०० क्यूसेकने तर कालव्यातून ३००० क्यूसेक आणि वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

उजनी धरणाची गुरूवारची स्थिती

पाणी पातळी 496.945मी

एकूण साठा : .3358.84दलघमी

उपयुक्त साठा : () 1556.03दलघमी.

टक्केवारी () : 102. 56%

मुख्य कालवा 3000क्यूसेक

बोगदा 900 क्यूसेक

विज निर्मिती 1500 क्यूसेक

सांडवा 65000क्यूसेक

धरणातील आवक- दौंड :-501.430/59354

First published: August 31, 2017, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading