उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादीची माझा बँड वाजवण्याची तयारी पण...

तर राजांनी मागायचं नाही तर आदेश द्यायचा असतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 08:00 PM IST

उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादीची माझा बँड वाजवण्याची तयारी पण...

सातारा 15 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार संध्याकाळी साताऱ्यात आली. माजी खासदार आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला ते उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचं स्वागत केलं. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उदयराजे भोसले यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारने माझं एकही काम केलं नाही. सगळे प्रस्ताव अडवून ठेवले. माझ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांनी फुलीच मारली. मात्र गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी अनेक कामं मार्गी लावली  असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, नैतिकता म्हणून मी खासदारकीचा राजीनामा दिला. आता नव्याने मतदारांचा कौल घेणार. राष्ट्रवादी माझा बँड वाजविण्याचा विचार करत असेल तर मी आत्ताच सांगून ठेवतो. माझ बँड कोणीही वाजवू शकणार नाही. माझा बँड मीच वाजवणार हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.

भाजपच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमामधून गणेश नाईकांचा काढता पाय

उदयनराजे म्हणाले, मी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक योजना घेऊन मंत्रालयात खेटे घातले. पण माझं एकही काम कधी केलं गेलं नाही. आज, उद्या असं करत मला चकरा माराव्या लागल्या. या सगळ्या गोष्टींना मी कंटाळून गेलो होतो. त्यामुळे मी शेवटी विचार केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ हे कामाला लावणारं नाही तर काम करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसलाय.

Loading...

युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?

नेहमी आडवा आणि जिरवा योजना राबवली, मग आत्मक्लेश करायची वेळ आली नसती असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला. शिवाजी महाराज यांच्या विचारातील भारतासाठी सरकारने पाऊलं उचललीत असंही ते म्हणाले. तर राजांनी मागायचं नाही तर आदेश द्यायचा असतो असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...