...जेव्हा उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

...जेव्हा उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी

'2000 साली बाळासाहेबांना त्रास दिलात आणि आज सुडाचं राजकारण करता असं कुठल्या तोंडाने बोलता?'

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर 15 ऑक्टोंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी कोल्हापूरात प्रचारसभा झाली. या सभेच्या सुरूवातीलाच त्यांनी कोल्हापूरकरांची माफी मागितली. ज्यावेळी महापूर होता, ज्यावेळी तुम्ही संकटात होता, त्यावेळी मी येऊ शकलो नाही. मी माफी मागतो, मला पाठ दुखीचा त्रास होता त्यामुळे मी येवू शकलो नाही असं म्हणत त्यांनी जनतेची माफी मागितली. मात्र शिवसैनिकांनी नागरिकांचे अश्रू पुसण्याचं काम केलं असंही त्यांनी सांगितलं. बंडखोरांवरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, सेना बंडखोर म्हणजे उद्धव यांचा सपोर्ट, भाजप बंडखोर म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा सपोर्ट असं म्हटलं जातं. पण असं काही नाहीये. आमची युती मजबूत आहे. बंडखोरांना निवडून देऊ नका. उद्या आमचेच सरकार येणार आहे. 5 वर्षात सेनेने कधीच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही असंही त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंचा 'लुंगी' प्रचार, लोकांनी करून दिली बाळासाहेबांची आठवण!

कोल्हापूर म्हटलं की जिवंतपणा आलाच. कोल्हापूरकर नेहमी भगव्यावर प्रेम करतात. आता टीका करायची कुणावर?  काँग्रेस नावाचा पक्ष होता. ही वेळ त्यांच्यावर का आली? स्वातंत्र्य लढाईत काँग्रेस होती मान्य, पण ती काँग्रेस वेगळी होती आताची वेगळी आहे. 10 रुपयात जेवण का देऊ नये? पवार तुम्ही जेवणाच्या ताटात खडे का टाकता? वेळ आली तर मी स्वयंपाक करेन, पण पाणी अजित पवार पाणी देईल असा टोलाही त्यांनी लगावला.

PMC बँक घोटाळा: खातेदाराचा जीव गेला, घोटाळेबाज मजेत, सरकार ढिम्म-प्रियंका गांधी

2000 साली बाळासाहेब अटक होणार बातम्या यायच्या. गुन्हा काय होता? 1992-1993 सालच्या गुन्हा? भगवा वाचवला म्हणून गुन्हा? मुंबई वाचवायचे काम त्यांनी केलं होतं त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांना त्रास दिला असा आरोपही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 10:02 PM IST

ताज्या बातम्या