या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले हे पवारांच्या आठवणी सांगताना रडू लागले होते. त्यांच्या आठवणी सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता त्यांनी वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 04:23 PM IST

या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

सातारा 27 सप्टेंबर : माजी खासदार आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले हे शरद पवारांना कायम गुरुस्थानी मानतो असं कायम सांगत असतात. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही पवार माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनातला आदर कधीच कमी होणार नाही असंही ते कायम सांगत असतात. मात्र EDने पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतरची त्यांची प्रतिक्रीया मात्र चक्रावणारी आहे. उदयनराजे म्हणाले, या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, दुसरं काय? ही प्रतिक्रिया त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले हे पवारांच्या आठवणी सांगताना रडू लागले होते. त्यांच्या आठवणी सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पवार जर साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीत उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाहीत असंही ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय.

पूरग्रस्तांच्या प्रचंड रोषामुळे चंद्रकांत पाटलांना घ्यावा लागला काढता पाय

आज मुंबईत काय झालं?

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समोर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार जर आज ईडी कार्यालयात गेले तर मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

Loading...

शरद पवारांच्या खेळीनंतर बदललं राजकीय समीकरण, भाजपसमोर नवं आव्हान

शिवसेनेची पॉवर पवारांच्या पाठीशी!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार यांचं या घोटाळ्यात कधीही नाव आलं नव्हतं, मग आता गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर आता शिवसेनेनंही शरद पवारांना क्लीन चिट दिल्याने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने पुढे येत अशी थेट भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचा संदेश काँग्रेसकडून देण्याचा प्रयत्न आता होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...