उदयनराजे करणार भाजपमध्ये प्रवेश, चंद्रकांत पाटील यांनी केला मोठा खुलासा!

गेल्या अनेक दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असं बोललं जातं होतं त्याला चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे दुजोरा मिळालाय.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 09:29 PM IST

उदयनराजे करणार भाजपमध्ये प्रवेश, चंद्रकांत पाटील यांनी केला मोठा खुलासा!

सोलापूर 1 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केलाय. ते म्हणाले, आमच्यावर टीका केली जाते की आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोरं पळवतो म्हणून. पण प्रवेश करणारे हे काही लहान मुलं नाहीत. अनेक मोठे नेते प्रवेश करताहेत. उदयनराजे, धनंजय महाडीक हे भाजपमध्ये प्रवेश करताहेत, करणार आहेत ही सगळी मंडळी समजदार आहेत. ते का असा निर्णय घेत आहेत याचा त्यांनीच विचार करावा असा टोही त्यांनी लगावला.

या सभेत काँग्रेसचे मान खटावचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे उस्मानाबादचे आमदार राणाजगजीतसिंह पाटिल आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते 7 सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून दिवसभरात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादला त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदींच्या दौऱ्याकडे लागलं आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे विरोधीपक्षांवरचा दबावही आणखी वाढलाय.

मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर, भाजपमध्ये प्रवेश करणारे 'संत' नाहीत - खडसे

Loading...

पंतप्रधान मोदी सकाळी 7 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर 2 वाजता औरंगाबाद आणि सायंकाळी 5 वाजता नागपूरमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या ब्रॉड ग्रेड कोचेसच्या कारखाण्याचा भूमिपूजन समारंभ असून जाहीर सभाही होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असून आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 13 सप्टेंबरच्या सुमारास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून त्या आधी पंतप्रधानांचा दौरा होत असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय.

सुरेश जैन यांनी मंत्री झाल्यावर केला होता 'घरकुल घोटाळा' दडपण्याचा प्रयत्न

'समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी 'राष्ट्रवादी'ची स्थिती'

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर  ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत अशी टीका त्यांनी केलीय. भाजपाच्या गंगेत डुबकी मारून पवित्र होऊ असा या नेत्यांचा समज आहे. मात्र ती गंगाच मलिन झालेली आहे. अशी टीकाही आडम यांनी केलीय. समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे असा टोलाही त्यांनी बीड इथं बोलताना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...