कॉलर उडविण्याच्या जबरी स्टाईलचं उदयराजेंनी सांगितलं 'हे ' रहस्य!

कॉलर उडविण्याच्या जबरी स्टाईलचं उदयराजेंनी सांगितलं 'हे ' रहस्य!

'मला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही म्हणून. होय, मला बोलता येत नाही अशी टीका केली जाते. शिक्षणात ते मोठे, मला त्यांच्यासारखं खोटं बोलता येत नाही.'

  • Share this:

संदीप राजगोळकर, कराड 09 ऑक्टोंबर : माजी खासदार आणि भाजपचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या कराडमध्ये त्यांची आज जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आणि पृथ्विराज चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, माझ्यावर टीका होते की मला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही म्हणून. होय, मला बोलता येत नाही. शिक्षणात ते मोठे, मला त्यांच्यासारखं खोटं बोलता येत नाही असं सांगत त्यांची नक्कल करत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना टोला लगावला. पद मिळवणं हा विकास नसतो, तुम्हाला पद लोकशाहीच्या राजांनी दिली आहे असं ते म्हणालेत. विकासासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती माझ्याकडे आहे असंही त्यांनी सांगितलं.

पुण्याला पावसानं पुन्हा झोडपलं, PMPबसवर झाड कोसळून चालक जखमी

कॉलर उडवतो अशी माझी टर उडवतात, होय कॉलर उडवतो, का उडवायची नाही? लोकांचं माझ्यावर प्रेम आहे त्यामुळे मी कॉलर उडवतो असंही ते म्हणाले. माझ्या कॉलर उडविण्यामुळे विरोधकांना काय करायचं असा सवालही त्यांनी केला. राजीनामा द्यायला जिगर लागतं असं म्हणत त्यांनी आजच्या सभेतही कॉलर उडवली. मी कधीही गैरव्यवहार केला नाही, करणार नाही. उमेदीच्या काळात त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत तर आता ते करणार का? अशी टीकाही त्यांनी केली.

भरपावसात वाहून गेली राज ठाकरेंची पहिली सभा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी (9 ऑक्टोंबर) पुण्यात पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. राज यांची ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातली पहिलीच सभा असल्याने ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र  संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा होण्याआधीच वाहून गेली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि आकाशातून कोसळणाऱ्या जलधारांमुळे मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. जे कार्यकर्ते जमले होते त्यांनी मैदानातल्या खुर्च्या डोक्यावर घेऊन बचाव करावा लागला सभा घेणं शक्यच नसल्याने अखेर वेळेवर सभा रद्द करावी लागली.

कार्यकर्त्याचा मान राखण्यासाठी 'सारथी' बनले राज ठाकरे!

मनसेचे एकमेव स्टार प्रचारक मुलुख मैदानी तोफ असलेल्या राज ठाकरेंच्या सभेची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना सरस्वती मंदिर शाळेचं मैदान मिळालं. या सभेवर परतीच्या पावसाचं सावट होतं. सभा होणार की याची भीती होती अखेर ती भितीच खरी ठरल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. कसबा गणपतीचं दर्शन घेऊन राज ठाकरे भाषण करणार होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 11:08 PM IST

ताज्या बातम्या