उदयराजेंनी पुन्हा एकदा केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप प्रवेशावर मात्र सस्पेन्स कायम

'भाजप मधल्या सर्वच नेत्यांसोबत चांगले संबध आहेत. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे शिवेंद्रराजे हे लहान भावासारखे आहेत. लहान मुलाने मांडीवर घाण केली तर मांडी कापत नाहीत.'

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 09:22 PM IST

उदयराजेंनी पुन्हा एकदा केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, भाजप प्रवेशावर मात्र सस्पेन्स कायम

सातारा 23 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले हे हातावरचं घड्याळ सोडून कमळ हातात घेतील अशी जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. ही भेट पूरग्रस्तांसाठी होती असं सांगितलं जात असलं तरी राजे हे राष्ट्रवादीला राम राम करतील असं म्हटलं जातंय. या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयराजेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचं कौतुक केलंय. मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार का?असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी थेट उत्तर न देता सस्पेन्स कायम ठेवला. राजेंच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चेला आणखी जोर येणार आहे.

गेल्या 70 वर्षांत अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट, नीती आयोगाची कबुली

उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर पहिल्यांदाच ते  पत्रकारांना सामोरे गेले. तुम्ही भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी मात्र थेट उत्तर न देता तळ्यात मळ्यात असं उत्तर दिलं. मात्र राज्य सरकारचं कौतुक करायला ते विसरले नाहीत. राष्ट्रवादीच्या काळात जी कामं झाली नाहीत ती कामं फडणवीस सरकारनं केल्याचं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेऊ असे संकेत देत गूढ कायम ठेवलं.

राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!

उदयनराजे म्हणाले, भाजप मधल्या सर्वच नेत्यांसोबत चांगले संबध आहेत. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले भाजपचे शिवेंद्रराजे हे लहान भावासारखे आहेत. लहान मुलाने मांडीवर घाण केली तर मांडी कापत नाही असं सांगत शिवेंद्रराजेंनी चुका केल्या तरी तो माझा धाकटा भाऊच आहे असं सांगायला ते विसरले नाहीत. हे सांगताना मात्र रामराजेंवरच्या प्रतिक्रियेला रागाच्या सुरात, ते मोठे राजे आहेत आम्ही लहान असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

उदयराजे भोसले यांनी याआधीही अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. तर राष्ट्रवादीमध्ये राजे असले तरी  ते कधी फारसे पक्षाच्या कार्यक्रमांना जात नाहीत. त्यामुळे स्थानिक नेते हे त्यांच्यावर नाराज असतात. लोकसभेच्या काळातच राजे युतीकडून लढतील असं बोललं जात होतं. मात्र शरद पवारांनी त्यांचं मन वळवल्याने त्यावेळी त्यांच होणारं बंड थंड झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...