उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे विजय संकल्प रॅली काढून दाखल करणार उमेदवारी अर्ज

उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे विजय संकल्प रॅली काढून दाखल करणार उमेदवारी अर्ज

भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण असाच सामना साताऱ्यात रंगणार आहे.

  • Share this:

सातारा,1 ऑक्टोबर: महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंगळवारी, 1 ऑक्टोबर रोजी विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मंगळवारी सकाळी 10 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यावेळी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विनीत कुबेर तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप सातारा लोकसभा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक अॅड. भरत पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी यांनी केले आहे.

साताऱ्यात यांच्यात रंगणार सामना..

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. त्यामुळे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण असाच सामना साताऱ्यात रंगणार आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, काल घटस्थापनेच्या मुहुर्तावर कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 51 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव दिले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या यादीनंतर सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांनी रिंगणात उतरवले आहे.

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी अचानक पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर आले. पण ही निवडणूक लढवण्यास पृथ्वीराज चव्हाण फारसे उत्सुक दिसत नाही आहेत. मात्र, आता त्यांना सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या तयारी करण्याचे आदेश हायकमांडने दिले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आधीपासून चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला आपला निर्णय कळवला होता. त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

VIDEO:...म्हणून वंचित आघाडीतून पडलो बाहेर, पडळकरांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 06:46 AM IST

ताज्या बातम्या