प्लास्टिक कागदावरून घसरला पाय.. आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात बुडाला मुलगा

प्लास्टिक कागदावरून पाय घसरून आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात मुलगा बुडाल्याची धक्कादायक समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 10:28 PM IST

प्लास्टिक कागदावरून घसरला पाय.. आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात बुडाला मुलगा

वीरेंद्रसिंग उत्पात, (प्रतिनिधी)

पंढरपूर, 27 सप्टेंबर: प्लास्टिक कागदावरून पाय घसरून आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात मुलगा बुडाल्याची धक्कादायक समोर आली आहे. अभिजीत रामचंद्र आगवणे (वय-17) असे मृत मुलाचे नाव आहे. अभिजीतसोबत एका कामगाराचाही बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील काळाखोरा या भागात रामचंद्र आगवणे यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, तळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे कागद लिकिज काढण्यासाठी रामचंद्र आगवणे यांचा मुलगा अभिजीत रामचंद्र आगवणे आणि राजस्थानमधील कामगार सुरेंद्रसिंह (वय 25) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोरीच्या साह्याने शेततळ्यात उतरले होते. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे प्लास्टिक कागदावरून सुरेंद्रसिंह याचा पाय घसरला आणि तो तळ्यामध्ये पडला शेजारीच उभा असलेल्या अभिजीतने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही पाण्यामध्ये पडले. हे सर्व दृश्य अभिजीतच्या आईच्या डोळ्यासमोर घडत होते. 'आई मला वाचव.. आई मला वाचव..' अशी आर्त हाक अभिजीत मारत होता. पण आई हतबल झाली, अखेर आईने स्वतःचा पदर अभिजीतच्या दिशेने फेकला. परंतु दोघेही तोपर्यंत बुडाले होते. हे वृत्त वाऱ्यासारखे खर्डी गावात पसरले. नागरिकांनी तळ्याकडे धाव घेतली. पाणी गढूळ झाल्यामुळे दोघांचा शोध घेणे अवघड झाले होते. अखेर बोरीच्या फांद्यां तळ्यात फिरवल्या अखेर सायंकाळी सातच्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

आईचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. अभिजीतच्या जाण्याने तो शिक्षण घेत असलेल्या सीताराम महाराज विद्यालयाने शाळा बंद ठेवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

VIDEO:कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 10:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...