कोल्हापुरच्या 'महालक्ष्मी'च्या मदतीला धावून आली तुळजापुरची 'तुळजाभवानी', पूरग्रस्तांना 50 लाख

कोल्हापुरच्या 'महालक्ष्मी'च्या मदतीला धावून आली तुळजापुरची 'तुळजाभवानी', पूरग्रस्तांना 50 लाख

कोल्हापुरच्या 'महालक्ष्मी'ला मदतीसाठी आता तुळजापुरच्या 'तुळजाभवानी'ची धावून आली आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ, (प्रतिनिधी)

उस्मानाबाद, 13 ऑगस्ट- कोल्हापुरच्या 'महालक्ष्मी'ला मदतीसाठी आता तुळजापुरच्या 'तुळजाभवानी'ची धावून आली आहे. कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानने 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने इतिहासात पहिल्यांदाच एवढी मदत जाहीर केली आहे.

ही मदत तीन टप्यात करण्यात येणार आहे. 25 लाख मुख्यमंत्री साह्ययता निधीमध्ये जमा करणार करण्यात येणार आहेत. 15 लाख रुपयांचे अन्न, धान्य आधीच कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. उर्वरित 10 लाख रुपयांची स्थानिक गरज पाहून देण्यात येईल, अशी माहिती संस्थानच्या सूत्रांनी दिली आहे.

प्रशासनाशी समन्वय ठेवूनच मदत वाटप करण्याचे आवाहन...

दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून पूरग्रस्तांपर्यंत मदत वाटप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी सस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची आहे, त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन त्यांच्यामार्फतच मदत साहित्य वाटप करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 34 (ल) नुसार मदत साहित्य वाटप करताना स्वयंसेवी स्ंस्थांनी कोणताही भेदभाव न बाळगता समान पद्धतीने वाटप करणे आवश्यक असल्याचे कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यानी सांगितले आहे.

आठ वर्षाय चिमुकलीने बर्थडेसाठी जमवलेले पैसे दिले पूरग्रस्तांना

मदत देण्यासाठी मोठी श्रीमंती नाही तर मोठं मन असावं लागतं. कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून ओघ सुरु झाला आहे. या मदत यज्ञात प्रत्येक जन आपापल्या परीने मदत करताना दिसत आहे. घरातील लोक काही तरी देत आहेत, हे पाहिल्यावर शेख तन्वीर या 8 वर्षांच्या चिमुकलीने तिच्या वाढदिवसासाठी वर्षभर जमा केलेल्या पैशाचा गल्ला वडिलांच्या हातात दिला आणि त्या पैशातून बिस्किट घेऊन ते पूरग्रस्तांना पाठवले आहे. एवढ्या बाल वयात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या शेख तन्वीरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बीड शहरातील शेख तन्वीर शेख रिजवान या आठ वर्षीय चिमुकलीने नवा आदर्श घालून दिला आहे. आई-वडील नातेवाईकांनी चॉकलेटसाठी दिलेले पैसे बर्थडेसाठी गल्ल्यामध्ये साठवून ठेवले होते. या पैशात नवे कपडे घेता येतील, असे तन्वीरने ठरवलं होतं. घरात टीव्हीमधील आणि वृत्तपत्रात बातम्या वाचून तन्वीर वडिलांना म्हणाली, 'बाबा मला यावर्षी कपडे नको..आपण हे पैसे पूरग्रस्तांना देऊ.' शाळेत आणि घरातील लोक पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करतात. मग या वर्षी कपड्यापेक्षा त्यांना खाऊ देऊ, असा तिने हट्ट धरला होता. तन्वीर हिने गल्ल्यातील पैसे काढून वडिलांना दिले.

तन्वीर ही द.बा. घुमरे पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. या मुलीची मदत करण्याची वृती इतरांना प्रेरणा देणारी आहे. घरातील संस्कार मुलांना घडवतात, तन्वीर ही याचे उत्तम उदाहरण आहे.

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 04:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading