गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेलेले कोल्हापूरचे तिघे समुद्रात बुडाले

गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेलेले कोल्हापूरचे तिघे समुद्रात बुडाले

कसबा बावडा (जि.कोल्हापूर) येथील तिघेजण गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (17 ऑगस्ट) पहाटे घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 17 ऑगस्ट- कसबा बावडा (जि.कोल्हापूर) येथील तिघेजण गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (17 ऑगस्ट) पहाटे घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. महिलांचे मृतदेह सापडले असून पुरुष बेपत्ता आहे. तिघे देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेल्याची माहिती मिळाली आहे. काजल जयसिंग मछले (वय-18), सुमन विशाल मछले (वय-23) आणि राहुल अशोक बागडे (वय-27) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी कसबा बावडा येथील मछली कुटुंबीय आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी गेले होते. पहाटे समुद्रावर तिघे अंघोळीसाठी गेले होते. तेव्हा समुद्र काहीसा खवळलेला होता. तरीही ते पाण्यात गेले. उसळलेली लाटेने त्यांनी आत ओढले. काजल व सुमन यांचे मृतदेह सापडले आहेत तर राहुल यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी कसबा बावडा येथून दोन वाहनांतून मछले यांचे नातेवाईक व मित्रपरिवार गणपती पुळ्याकडे रवाना झाले.

जळगावात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू

जळगाव शहरातील मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांपैकी दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (16 ऑगस्ट) सायंकाळी घडली. मोहम्मद अनस जकी अहमद (वय-14), मोहम्मद उमेर जकी अहमद (वय-12) आणि मोहम्मद अबूलैस जकी अहमद (वय-16, तिघे रा. अक्सा नगर, मेहरूण, जळगाव) हे सायंकाळी सुमारास एकत्र मेहरूण तलावाकडे फिरण्यासाठी गेले. यावेळी तिघे भाऊ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने मोहम्मद उमेर आणि अबूलैस जकी हे पाण्यात बुडाले. तर अनिस जकी थोडक्यात बचावला. दरम्यान, दोघा भावंडांचे मृतदेह बाहेर काढून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले.

VIDEO: राज्यात MBA कॉलेजमध्ये शिकवणी अजूनही बंद, 35 हजार विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading