पाणी मिळाल्याशिवाय 'बाप्पां'चं विसर्जन नाही, शेतकरी बसले उपोषणाला

एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 08:10 PM IST

पाणी मिळाल्याशिवाय 'बाप्पां'चं विसर्जन नाही, शेतकरी बसले उपोषणाला

विरेंद्र उत्पात, 12 सप्टेंबर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष  सुरु असतानाच पंढरपूर तालुक्यात  मात्र  पाण्यासाठी शेतकऱ्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केलंय. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचं विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतल्यानं प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झालाय. नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी  मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

गणपती बप्पाचं विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसं करायाचं अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकऱ्यांनी चक्क गणरायासमोरच उपोषण सुरु केलंय. इतकच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिलाय.

पाण्यासाठी गणरायाचं विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

सस्पेन्स वाढला! पवारांसोबतच्या बैठकीनंतर उदयनराजेंच्या मनात नेमकं चाललंय काय?

Loading...

गणेश विसर्जन करताना युवक गेला वाहून

विदर्भातल्या लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर हे भाविक गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेला. त्यांचे वय 40 वर्षे होतं. आज ढोलसर वरुन वाजत गाजत गणपती विसर्जना ची मिरवणुक मासळ जवळील नाल्यावर आली असताना मासळ- बाचेवाडी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर गणपती विसर्जना दरम्यान मुर्ती ढकलतेवेळी  पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहुन गेला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही. लोकांनी त्यांचा शोध घेतला मात्र अजुनही थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या मागे पत्नी व तीन मुली आहेत. सध्या गेल्या काही दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. मराठवाड्यात नांदेडजवळही  गणेश  विसर्जनाच्या वेळी  खदानीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार असं त्या युवकाचं नाव असून तो 21 वर्षांचा होता.  हदगाव तालुक्यातील तामसा गावातली ही घटना आहे. गावकऱ्यांनी त्याचा  मृतदेह खदानीबाहेर काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 08:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...