मुंबईची गाडी चालवणार ही 'कोल्हापूर एक्स्स्प्रेस'; कोल्हापुरी कन्या झाली लोकोपायलट

मुंबईची गाडी चालवणार ही 'कोल्हापूर एक्स्स्प्रेस'; कोल्हापुरी कन्या झाली लोकोपायलट

कोल्हापूरची कन्या तन्वी चौगुले पश्चिम रेल्वेत लोको पायलट म्हणून रुजू झाली असून तिचा इथंपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 20 जानेवारी : महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. सर्वच ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीनं त्या काम करत आहेत. फक्त शहरांमध्येच नाही तर गावातूनही उच्च शिक्षण घेऊन मोठी भरारी घेणाऱ्या मुलींचे वाढते प्रमाण दिलासा देणारं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे इथल्या तन्वी चौगुले ही नुकतीच लोको पायलट म्हणून रूजू झाली आहे. गावातून शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यात पुढचं शिक्षण घेतलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण करून तन्वी रेल्वेत लोकोपायलट म्हणून ती रूजू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ती पहिलीच महिला लोकोपायलट ठरली आहे.

एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या तन्वीने दहावीपर्यंतचे शिक्षण देवी पार्वती हायस्कूल वडणगे इथं आणि एमएलजी शाळेत घेतलं. त्यानंतर अभियांत्रिकेचे शिक्षण न्यू पॉलिटेक्निक आणि डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, आकुर्डी(पुणे) इथे पूर्ण केलं. मेकॅनिकलमध्ये असलेल्या आवडीमुळे काहीतरी वेगळं करायचं असं तिच्या मनात होतं. जेव्हा रेल्वेमध्ये लोकोपायलट पदाची भरती असल्याचं समजलं तेव्हा तन्वीने जोरदार तयारीला सुरुवात केली.

आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा

तन्वीने लोकोपायलटसाठी अवघड असे सर्व टप्पे यशस्वीपणे पार केलं. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने बडोद्या इथं प्रशिक्षण पूर्ण केलं. सध्या तन्वी पश्चिम रेल्वेच्या बांद्रा टर्मिनसमध्ये रूजू झाली आहे. गाड्या यार्डमधून बाहेर काढणं, प्लॅटफॉर्मवर लावण्यासह तन्वीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

रेल्वेमधून दररोज हजारो लोक प्रवास करत असतात. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत काही निर्णय घ्यावे लागतात. कधी कोणता प्रसंग ओढावेल हे सांगता येत नाही. तेव्हा मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असतं. यासाठी वेगळी परीक्षा, चाचणी प्रशिक्षणावेळी घेतली जाते. हे सर्व प्रशिक्षण पूर्ण करून तन्वीने आता रेल्वेचं स्टेअरिंग हातात घेतलं आहे.

भावाच्या लग्नात पूर्ण केली अपुरी इच्छा! अशी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल

First published: January 20, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या