• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'लोकांच्या कामासाठी कधीही फोन करा', मंत्री शंभूराजे देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना

'लोकांच्या कामासाठी कधीही फोन करा', मंत्री शंभूराजे देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना

लोकांच्या कामासाठी अडचणीत मला कधीही फोन करा मी ते सोडवण्यासाठी प्रयत्न करीन, अशा सुचना शंभूराजे देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

  • Share this:
कोल्हापूर, 16 फेब्रुवारी - जिल्ह्याचं विकासात्मक काम करताना काही अडचणी आल्या तर थेट मला फोन करा. निश्चितपणे त्या सोडविल्या जातील. परंतु उठावदार काम झालं पाहिजे, अशी सूचना वित्त आणि नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिली. शासकीय विश्रामगृहात गृह, वित्त आणि नियोजन, उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते. राज्यमंत्री देसाई यांनी विभाग निहाय आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने झालेली तरतुद, झालेला खर्च यांचा समावेश होता. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती यादव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी यावेळी त्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यामध्ये एकूण किती आयटीआय आहेत. त्याबाबतची सद्यस्थिती या विषयी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली. अकार्यक्षम संस्था बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी कौशल्य विकास विभागाला दिल्या. ते म्हणाले की, "ग्रामीण भागात युवकांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विभागानं प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. लवकरच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिनही जिल्ह्यांसाठी एकत्रित बैठक लावली जाईल. जिल्ह्यासाठी गतवर्षी पेक्षा 60 कोटीचा वाढीव निधी दिला आहे. जिल्ह्यात विकासाचं काम चांगलं होईल या दृष्टीने अधिकाऱ्यांनी काम करावं. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले. प्लॅस्टिक मुक्तीसाठी आयुक्तांचं प्रभावी काम महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी हे प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्रभावीपणे काम करत आहेत. बुके स्वीकारताना प्लॅस्टिमुक्त बुके पाहून समाधान वाटल्याचं मंत्री महोदय म्हणाले. आयुक्तांचं हे काम पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निश्चित पोहचवू, असंही ते म्हणाले. पोलीस अधीक्षकांसह पथकाचं विशेष कौतुक किती टोल नाक्यावर राजस्थानमधील कुख्यात‍ बिष्णोई टोळीला जीव धोक्यात घालून जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस पथकाचा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) म्हणून शंभूराजे देसाई यांनी विशेष सत्कार केला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्यासह पथकातील पोलीस जवानाचांही त्यांनी सत्कार केला. या पथकाला विशेष गौरव पदक मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.
Published by:Manoj Khandekar
First published: