चालत्या ST बसमध्येच ड्रायव्हरला आला हार्टअ‍ॅटॅक, बाईकला बसली धडक

चालत्या ST बसमध्येच ड्रायव्हरला आला हार्टअ‍ॅटॅक, बाईकला बसली धडक

चालक आणि वाहकांच्या राहण्याची व्यवस्थाही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे त्यांना अतिशय वाईट परिस्थितीत राहावं लागलं हे अनेकदा उघड झालंय.

  • Share this:

सातारा 5 नोव्हेंबर : दिवाळीच्या संपलेल्या सुट्या आणि सगळ्यांनाच गावी जाण्याची घाई यामुळे ग्रामीण भागात सध्या ST बसमध्ये मोठी गर्दी आहे. साताऱ्याजवळ ST बसच्या ड्रायव्हरला गाडी चालवत असतानाच हार्टअ‍ॅटॅक आल्याची धक्कादायक घटना घडलीय. ड्रायव्हरला छातित वेदना होत असल्याने त्याचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस दुभाजकाला धडकली. त्यामुळे दोघे जखमी आहेत. तर एस.टी.च्या ड्रायव्हरवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एस.टी. चालक आणि वाहकांवर असलेल्या कामाच्या ताणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

VIDEO: उद्ध्वस्त झालं पीक; उद्धव ठाकरेंसमोर ढसाढसा रडला शेतकरी

मुंबईकडून कराडकडे ही एसटी बस जात होती. साताऱ्यातील खिंडेवाडीजवळ हा अपघात झाला. एसटी चालक विकास मारूती पवार (वय 39 ) यांना  हार्टअ‍ॅटॅक आल्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खिंडेवाडी जवळ सकाळी दहा च्या सुमारास एसटी आल्यानंतर दुभाजक पार करून पलीकडील रस्त्यावर जात असताना अचानक चालकाच्या छाती मध्ये दुखू लागल्याने ही बस एका झाडाला आदळली. या दरम्यान समोरून येणाऱ्या दुचाकी वरील महिला किरकोळ जखमी झाली आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नसून अपघातातील जखमींसह चालकाला सातारा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लव्ह सेक्स और धोका.. पुण्यात त्याने फेसबुकवर अपलोड केले मैत्रिणीचे नग्न फोटो

दिवाळीमुळे सुटीवर गेलेले लोक. कामाचा ताण आणि खराब रस्ते यामुळे ड्रायव्हरवर मोठा ताण येतो. गाड्यांची स्थितीही अतिशय खराब असल्याने धोका पत्करून गाडी चालवावी लागते. खराब रस्त्यांमुळे अनेक चालकांना पाठदुखीचा त्रास होतोय. तसच अनेक आजारांनीही ग्राहसलंय. चालक आणि वाहकांच्या राहण्याची व्यवस्थाही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे त्यांना अतिशय वाईट परिस्थितीत राहावं लागलं हे अनेकदा उघड झालंय. त्यामुळे आतातरी सरकार याचा विचार करणार का याकडे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष वेधलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading