शिवसेनेत उभी फूट; नगरमध्ये पक्षाचा उमेदवार सोडून राष्ट्रवादीला दिली साथ

शिवसेनेत उभी फूट; नगरमध्ये पक्षाचा उमेदवार सोडून राष्ट्रवादीला दिली साथ

एका जागेसाठी अमोल येवले आणि अनिल शिंदे या शिवसेनेच्याच दोन नगरसेवकांमध्येच लढत झाली.

  • Share this:

अहमदनगर,26 डिसेंबर: जिल्हा नियोजन समितीमधील रिक्त असणाऱ्या दोन जागांसाठी 24 डिसेंबरला मतदान झाले. अखेर गुरुवारी निकाल समोर आले. शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे व राष्ट्रवादीचे नगरसेवक विनीत पाऊलबुधे हे विजयी झाले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांना मोठा धक्का मानला जात आहे. अनिल शिंदे यांना तब्बल 52 मते मिळाली.

जिल्हा परिषदेची एक, महापालिकेच्या तीन व लहान नागरी क्षेत्राची म्हणजे नगरपालिकेची एक, अशा एकूण पाच रिक्त जागा तसेच जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार होती; मात्र, यापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या उर्वरीत दोन जागांसाठी मतदान घेण्यात आली. या निवडणुकीत मतदारांची संख्या 67 होती. मतदारांमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादीचे 18, भाजपचे 14, काँग्रेसचे 5, बसपचे 4, समाजवादी पक्षाचा 1 आणि अपक्ष 2 नगरसेवक होते. महापालिकेच्या सर्वसाधारण प्रवर्गातील एका जागेसाठी अमोल येवले आणि अनिल शिंदे या शिवसेनेच्याच दोन नगरसेवकांमध्येच लढत झाली. हे दोन नगरसेवक आमने-सामने निवडणुकीच्या रिंगणात आल्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र होते. त्यातच अमोल येवले हे माजी आमदार अनिल राठोड यांचे समर्थक समजले जातात. त्यामुळे त्यांना किती मते पडणार, त्यावरून राठोड समर्थक की विरोधक यापैकी कोणत्या गटाची ताकद शहरामध्ये वाढली आहे, हे स्पष्ट होणार असल्याने या निकालाकडे नगरकरांचे लक्ष लागले होते.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिली राष्ट्रवादीला साथ

नियोजन समितीमधील महापालिकेच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागेसाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनित पाऊलबुधे यांच्यात लढत झाली. विनित पाऊलबुधे यांना 48 मतांनी विजयी झाले. या आकडेवारीवरून शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आपल्या पक्षाचा उमेदवार सोडून राष्ट्रवादीला साथ दिल्याचे स्पष्ट झाले.

First Published: Dec 26, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading