पुन्हा होणार राजकीय 'भूकंप', हे 5 दिग्गज नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायम सत्तेत राहण्याची सवय लागलीय. त्यामुळे विरोधात राहून काहीच फायदा नसल्याचं लक्षात आल्यानं भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी यानेत्यांची रिघ लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 05:25 PM IST

पुन्हा होणार राजकीय 'भूकंप', हे 5 दिग्गज नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

विवेक कुलकर्णी, मुंबई 29 ऑगस्ट : निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. नेत्यांचं पक्ष बदलण्याचं प्रमाण एवढं वाढलं की आता त्याला मेगाभरती असं नावही पडलं. या मेगाभरतीचा आणखी एक टप्पा पुढच्या आठवड्यात होणार असून त्याचा मुहूर्तही ठरला आहे. 1 सप्टेंबरला सोलापूरात आणि 5 सप्टेंबरला मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले 5 दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सगळे बडे नेते असल्यानं त्यासाठी खुद्द भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा हे राज्यात येत आहेत. त्यामुळे  पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या महाजनादेश यात्रेवर आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप 1 सप्टेंबरला पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी काही दिग्गज नेते भाजमध्ये प्रवेश करतील. तर 5 तारखेला मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार आहे.

बिघाड EVMमध्ये नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यात झालाय - मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, सिद्धराम म्हेत्रे यांच्या नावांची जोरदार चर्चा असून या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जातोय. उदयनराजे भोसले यांना तर भाजपच्या सगळ्याच बड्या नेत्यांनी भाजपमध्ये या अशी गळच घातलीय. उदयनराजेंचा साताऱ्यात प्रभाव आहे. ते कुठल्याही पक्षात असले तरी त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग साताऱ्यात आहे.

राजे हे राष्ट्रवादीत नाराज असल्याने ते पक्ष सोडतील असं बोललं जात होतं. जे काम काँग्रस-राष्ट्रवादीनं केलं नाही ते काम भाजपने केलं असं सांगत उदयनराजेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय.

Loading...

काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची बोलणी निष्फळ, 'वंचित' देणार धक्का!

तर गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सहकार्य केलं नसल्यामुळेच पराभव झाला असं हर्षवर्धन पाटील यांना वाटतं. लोकभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

मात्र राष्ट्रवादीवर त्याचा भरवसा नाही त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी थेट भाजपमध्येच जाण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. राज्यातली बदलती परिस्थिती लक्षात घेऊन अनेक नेत्यांना सत्तेची उब हवी असते. त्यामुळे विरोधात राहून काहीच फायदा नसल्याचं लक्षात आल्यानं भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी सध्या नेत्यांची रिघ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...