मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिक्किममध्ये लष्कराचं वाहन कोसळलं खोल दरीत, साताऱ्यानं गमावला भूमिपूत्र

सिक्किममध्ये लष्कराचं वाहन कोसळलं खोल दरीत, साताऱ्यानं गमावला भूमिपूत्र

सुजित किर्दत हे 106 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. रेस्क्यूसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला

सुजित किर्दत हे 106 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. रेस्क्यूसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला

सुजित किर्दत हे 106 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. रेस्क्यूसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला

  • Published by:  Sandip Parolekar
सातारा, 21 डिसेंबर: सातारा जिल्ह्यातील (Satara District, Maharashtra) चिंचणेर निंब येथील जवान (Indian Solider)  सुजित नवनाथ किर्दत यांचे सिक्कीममध्ये (Sikkim) अपघाती निधन झालंची माहिती समजते. सुजित किर्दत हे 106 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. रेस्क्यूसाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि गाडी दरीत कोसळली त्यातच त्यांचे निधन झालं. जवान सुजित किर्दत यांच्या निधनानं चिंचणेर निंब गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हेही वाचा...तलाठी भरतीत मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिला, उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश सुजित किर्दत त्यांच्या पश्च्यात वडील, भाऊ, पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सुजित किर्दत यांचे पार्थिव उद्या त्यांच्या मूळगावी चिंचणेरमध्ये पोहचणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुजित यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून गावकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. सुजित यांचं पार्थिव सध्या बागडोगरा येथे आहे. उद्या रात्री 8 वाजता पुणे एअरपोर्ट पोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती मिळते. ड्युटीवर असताना जवानाने सोडले प्राण कर्तव्य बजावत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चरण तालुक्यातील एका जवानाचा काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं. अमित भगवान साळोखे (वय-30) असं मृत जवानाचं नाव आहे. हेही वाचा.....तर शरद पवार पश्चिम बंगालला जाणार, ममतादीदींनी फोनवर केली चर्चा बालाघाट मध्य प्रदेश येथे भगवान साळोखे हे ड्युटीवर तैनात असताना ह्रदयविकाराचा झटका आला. ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भगवान साळोखे हे 123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C.R.P.F) मध्ये बालाघाट मध्य प्रदेश येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते 2009 ला केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते.
First published:

पुढील बातम्या