VIDEO सोलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी नोटांची अशी झाली उधळण

VIDEO सोलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी नोटांची अशी झाली उधळण

प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापुरात आयोजित स्वागत मिरवणुकील हा प्रकार घडला.

  • Share this:

सोलापूर 13 जानेवारी : अतिउत्साही कार्यकर्ते नेत्यांना खूष करण्यासाठी केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. सोलापूरातील शिवसैनिकांनी नव्या नेत्याची नियुक्ती आणि त्यानंतच्या मिरवणुकीत चक्क नोटाच उधळून लावल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अति उत्साही कार्यकर्त्यांच्या या नोटा उधळण्याच्या कृतीवर टीकाही केली जातेय.

शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागत मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी या नोटा उडविल्या होत्या. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केलेल्या जिल्हाप्रमुख ठोंगे पाटील यांच्या जागी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती झाली आहे. प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापुरात आयोजित स्वागत मिरवणुकील हा प्रकार घडला.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्रीच नाराज

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये सुरू असलेले नाराजी नाट्य संपण्याची चिन्हे नाहीत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि क्रमांक दोनचे मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचं विभाजन होऊन नगरविकास - 3 असं नवं खातं निर्माण केली जाणार असल्याची चर्चा आहे. यात मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, सिडको अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असेल असंही सांगितलं जातेय. सध्या नगरविकास विभागाकडे ही सर्व खाती आहेत. ती खातीच गेली तर मग नगरविकास खात्याला काहीच अर्थ राहणार नाही असं बोललं जातंय.

'प्लास्टिकचं नकली अंडं दाखवा आणि 1 हजार मिळवा'

नगरविकास खात्याचं विभाजन करून ती खाती स्वत: मुख्यमंत्री घेतील किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवली जातील अशीही चर्चा आहे. या हालचालींमुळे शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.शिवसेनेत ठाकरे परिवारानंतर एकनाथ शिंदे सगळ्याच ताकदवान नेते समजले जातात. सत्तास्थापनेच्या नाट्यात शिवसेनेच्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात शिंदे यांचा मोठा सहभाग होता. या संभाव्य बदलामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 13, 2020, 9:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading