Home /News /maharashtra /

शेतकऱ्याने शक्कल लढवली आणि 1 एकरमध्ये घेतलं लाखोंचं उत्पन्न

शेतकऱ्याने शक्कल लढवली आणि 1 एकरमध्ये घेतलं लाखोंचं उत्पन्न

प्रयोगाशील शेतीतून निमगावमधील एक शेतकरी लखपती झाला आहे.

    वीरेंद्रसिंह उत्पात, 2 जानेवारी, माळशिरस : माळशिरस तालुक्यातील निमगावची ओळख पैलवानांचे गाव अशी आहे. तसंच ऊस उत्पादनातही हे गाव अव्वल असते. पण मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीनंतर इथल्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा नाद आता कमी केला आहे. पीक पध्दतीत बदल करून त्यातून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा कल वाढत आहे. अशाच प्रयोगातून निमगावमधील एक शेतकरी लखपती झाला आहे. निमगावातील शेतकरी युवराज मगर यांच्याकडे सात एकर जमीन आहे. यामध्ये डाळींब, मका, केळी आणि मिरचीची लागवड त्यांनी केली आहे. ऊसाच्या शेतीला दुष्काळात फटका बसल्याने त्यांनी आपल्या शेतात असा पीक बदल केला आहे. एक एकर शेतात त्यांनी मिरचीची लागवड केली आहे. आतापर्यंत 35 टन मिरचीची विक्री झाली आहे. तर अजून 15 टन उत्पादन निघेल असा अंदाज आहे. मिरचीला एका किलो मागे सरासरी 25 रूपये भाव मिळाल्याने मगर यांना सात लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. अजून दोन लाख रूपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. युवराज मगर यांना आतापर्यंत एक एकर मिरची लागवडी साठी सत्तर हजार रूपये खर्च आला आहे. आंदोलक ते मंत्री, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बच्चू कडूंचा प्रवास जुलै महिन्यात लागवड झालेल्या मिरचीने निमगावातील या शेतकऱ्याला सहा महिन्यात लखपती बनवले आहे. लागवड करताना नांगरणी करून रोटावेटर केलं. खते टाकल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरला. एक एकरात अकरा हजार रोपे लावली आहेत. अमावस्या आणि पौर्णिमा वेळी अळी न होण्यासाठी फवारणी करावी लागत असल्याचे शेतकरी अमोल मगर सांगतात. ऊसाचे पीक म्हणून ओळख असलेल्या पाणीदार निमगाव हे गावसुध्दा दुष्काळापासून वाचू शकले नाही. यामुळे इथल्या शेतकर्यानी पीक पद्धती बदलण्यास सुरुवात केली. केळी, डाळींब अशी कमी पाणी आणि कमी महिन्यात उत्पन्न देणारी पीक निवडली. अशाच मिरचीने मगर यांना सहा महिन्यात जवळपास दहा लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळवून दिलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Farmer, Solapur

    पुढील बातम्या