Home /News /maharashtra /

पती मुंबईत, पत्नी सोलापूरात; कोर्टाने Video Conferenceवर दिली घटस्फोटाला मंजुरी

पती मुंबईत, पत्नी सोलापूरात; कोर्टाने Video Conferenceवर दिली घटस्फोटाला मंजुरी

देशात आणि महाराष्ट्रात अडीच महिने लॉकडाऊन होतं. त्या काळात सगळे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे न्यायालयातही अनेक खटले प्रलंबित पडले आहेत.

सोलापूर 8 जुलै: सोलापुरातील कौटुंबिक न्यायालयाने (Solapur family court ) नुकताच एक घटस्फोटाला (Divorce) व्हिडिओ कॉन्फरन्सवर(Video Conference) झालेल्या सुनावणीत मंजुरी दिली आहे. यामध्ये पतीची साक्षही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदवण्यात आली. या प्रकरणतील पती हा मुंबईतील असून पत्नी सोलापूर येथील रहिवासी होती. लॉकडाऊनमुळे पतीस मुंबई वरून सोलापूर येथे येऊन साक्ष नोंदवणे शक्य नव्हते. त्यामुळे न्यायालयाने पतीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्राह्य धरून घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलाय. घटस्फोट मंजूर झाल्याचा आदेशही कोर्टाने काढला आहे. न्यायाधीश वाय. जि. देशमुख यांनी हा अर्ज मंजूर केला आहे. पती आणि पत्नीतर्फे ॲडव्होकेट संदेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. यामध्ये तंत्रज्ञान आणि कायद्याचा सुरेख संगम पाहायला मिळालाय. तसेच लॉकडाऊनकाळातील कोर्टाचा एक सकरात्मक निर्णय म्हणून याकडे पाहिलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरणाची सुनावणी सुरू होती. हा अंतिम टप्पा असल्याने कोर्टानेही सगळी परिस्थिती पाहून हा निर्णय घेतल्याने वकिल वर्गातही समाधान व्यक्त होत आहे. देशात आणि महाराष्ट्रात अडीच महिने लॉकडाऊन होतं. त्या काळात सगळे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे न्यायालयातही अनेक खटले प्रलंबित पडले आहेत. हे वाचा -  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारला अपघात त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी जिल्हाबंदी असल्याने प्रवास करणं कठिण आहे. त्यातच सार्वजनिक वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवास करणही अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयाने तंत्रज्ञानाचा उपयोग करत हा निकाल दिला आणि दोघांचीही मानसिक त्रासातूनही मुक्तता झाली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या