महिलांवर अत्याचार.. अण्णा हजारे चिंतातूर, या दिवशी मौन धारण करणार

महिलांवर अत्याचार.. अण्णा हजारे चिंतातूर, या दिवशी मौन धारण करणार

अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून देशात वाढते महिला अत्याचार आणि हत्येबाबत चिंता व्यक्त केली.

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,9 डिसेंबर: दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत. न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतीत करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 20 डिसेंबर पासून मौन धारण करणार आहेत. सरकारने तातडीने पावले न उचळल्यास बेमुदत उपोषण आंदोलन करू, असा इशारा पण अण्णांनी दिला आहे.

अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवून देशात वाढते महिला अत्याचार आणि हत्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात न्यायाला आणि प्रत्यक्ष शिक्षेला होणाऱ्या अक्षम्य विलंबाबाबत नाराजी स्पष्ट केली आहे. दिल्ली निर्भया प्रकरण, पुण्यातील ज्योतिकुमार चौधरी बलात्कार प्रकरणातील फाशीची अंमलबजावणी न झाल्याने गुन्हेगारांची रद्द झालेली फाशी, हैदराबाद निर्भया प्रकरण आणि एन्काऊंटर आदी प्रकरणांचा दाखला देत न्यायाला आणि शिक्षेला होणारा उशीर नवीन गुन्ह्यांना प्रोत्साहीत करणारा ठरत असल्याचे म्हटले आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झालेली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही. फास्टट्रॅक कोर्टात सहा लाखाहून अधिक प्रकरणे आहेत, त्यातील अनेक प्रकरणे सहा-सात वर्षांपूर्वीची आहेत. निर्भया फंड महाराष्ट्रासह अनेक राज्यात उपयोगविना पडून आहे. हेल्पलाईन नंबर 1091 काम करत नाही, 2012 पासून ज्यूडीसीएल अकाऊंटबिलिटी बिल संसदेत पडून आहे. आदींवर अण्णांनी बोट ठेवत पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात शेवटी अण्णांनी निर्भया प्रकरणी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल येत्या 20 डिसेंबरपासून मौन धारण करणार असल्याचे सांगितले आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 9, 2019, 9:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading