मेव्हणीनं प्रेमात केला विश्वासघात.. पोटच्या मुलांना विष पाजून 'त्याने' केली आत्महत्या

मेव्हणीनं प्रेमात केला विश्वासघात.. पोटच्या मुलांना विष पाजून 'त्याने' केली आत्महत्या

तो मुलांना घेऊन उजनी कालव्याजवळ गेला. एका झाडाखाली थांबून त्याने मुलांना भजी आणि कोल्ड्रिंक्समधून दिले विष

  • Share this:

सोलापूर,2 नोव्हेंबरः मेव्हणीनं प्रेमात विश्वासघात केला, याचा राग डोक्यात घेऊन जन्मदात्या पित्याने पोटच्या दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माढा तालुक्यातील बेंबळे गावाच्या हद्दीत हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली. रवींद्र प्रभाकर लोखंडे (वय-35), आयुष(वय-6) तर अजिंक्य (वय-9) अशी मृतांची नावे आहेत. मुलगी अनुष्का (वय 11) हिच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हे सर्व वडापुरी (ता.इंदापूर) रहिवासी आहेत. टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठीतून झाल अनैतिक संबंधाचा उलगडा...

रवींद्र प्रभाकर लोखंडे याचे त्याच्या मेव्हणीसोबत अनैतिक संबंध होते, याचा उलगडा पोलिस तपासात झाला आहे. प्रेमाच्या धुंदीत काही मिनिटांतच रवींद्रने संसाराची राखरांगोळी केली. मेव्हणी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहे. रवींद्रच्या खिशात एक चिठ्ठी आणि मोबाइल सापडला.चिठ्ठीमध्ये त्याने मेव्हणी सुनीता कांबळे हिच्या प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. सुनीताने विश्वासघात केल्याने तिच्या गावी (बेंबळे) माझ्या मुलांची हत्या करून म आत्महत्या करत असून याला सुनीता कांबळे हिच जबाबदार असल्याचे त्यान चिठ्ठीत नमुद केले आहे.

भजी आणि कोल्ड्रिंक्समधून मुलांना दिले विष...

रवीद्र लोखंडे आपल्या तिन्ही मुलांसोबत बेंबळे गावात मेव्हणीकडे आला होता. मात्र, तिच्या घराला कुलूप होते. त्यामुळे तो मुलांना घेऊन उजनी कालव्याजवळ गेला. एका झाडाखाली थांबून त्याने मुलांना भजी आणि कोल्ड्रिंक्समधून विष दिले. नंतर त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: solapur
First Published: Nov 2, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading