महाबळेश्वरच्या घाटात शिवशाही बसला भीषण अपघात, 27 प्रवाशी गंभीर

महाबळेश्वरच्या घाटात शिवशाही बसला भीषण अपघात, 27 प्रवाशी गंभीर

शिवशाही बस आणि समोरून येणारी खासगी बसचा पसरणी घाटातील 16 नंबरच्या वळणावर भीषण अपघात झाला.

  • Share this:

सातारा,9 डिसेंबर: वाई-महाबळेश्वरच्या घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाला असून 27 प्रवाशी गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. शिवशाही बस आणि खासगी बस घाटातून जात एकमेकींना घासल्याने हा अपघात झाला.खाजगी बस पलटी झाली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी की, दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना बसमधून बाहेर काढून तातडीने वाई आणि पाचगणी येथील दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

दोन्ही बसची समोरासमोर धडक

पुण्याहून महाबळेश्वरला जाणारी शिवशाही बस आणि समोरून येणारी खासगी बसचा पसरणी घाटातील 16 नंबरच्या वळणावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बस एकमेकींना घासल्याने खासगी बस जागेवर पलटी झाली. यामध्ये दोन्ही वाहनातील सुमारे 27 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैव्य बलवत्तर म्हणून..

खासगी बस जागेवर पलटी झाली. अन्यथा कठड्याला धडकून ती दरीत कोसळली असती. मोठी जीवितहानी झाली असती. दैव्य बलवत्तर म्हणून खासगी बसमधील प्रवाशी थोडक्यात बचावले. ही बस पुणे येथे विवाहासाठी जात होती.

शिवशाही बस 25 फुट खोल दरीत कोसळली

पुण्यातील कात्रजच्या जुन्या घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. कात्रजचा जूना घाट संपल्यावर शिंदेवाडी(हद्दीत) शिवशाही बस सुमारे 20-25 फुट खोल दरीत कोसळली. ही बस स्वारगेटवरून सांगलीला जात होती. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवासी जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेबद्दल समजल्यानंतर पोलीस आणि बचावपक्ष घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने आज दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची भिती आहे. पोलिस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. क्रेनच्या मदतीने बसला दरीतून बाहेर काढण्यात येणार आहे. तर अपघातामुळे परिसरात वाहनांची गर्दी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तात्काळ नजिकच्या स्थानिक रुण्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दोन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांआधी वारकऱ्यांच्या बसलादेखील भीषण अपघात झाला होता. त्यात 13 भाविकांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 05:45 PM IST

ताज्या बातम्या