'सरकारच्या कारभारावर मी नाराज', शिवसेना आमदाराने दिला घरचा अहेर

'सरकारच्या कारभारावर मी नाराज', शिवसेना आमदाराने दिला घरचा अहेर

शिवसेनेसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचेही आमदार सातत्याने आपली नारारी उघडपणे बोलून दाखवताना दिसत आहे.

  • Share this:

सांगली, 4 जानेवारी : मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र असं असलं तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी थांबताना दिसत नाही. शिवसेनेसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचेही आमदार सातत्याने आपली नारारी उघडपणे बोलून दाखवताना दिसत आहे. त्यातच सांगलीचे शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी थेट सरकारच्या कारभारावरून टीकास्त्र सोडलं आहे.

'मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी राजीनामा देणार नाही. माझी नाराजी ही सरकारच्या कामाच्या बाबतीतील आहे. आता 3 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरी अजून मंत्रिपद वाटपाचा घोळ सुरू आहे. पण अजून खातेवाटप झाले नाही. जे खाते मिळेल ते घेऊन जास्त रस्सीखेच न करता तिन्ही पक्षांनी आता लोकांची कामे सुरू करावीत, लोकांना सरकारकडून अपेक्षा,' असं म्हणत शिवसेना आमदार अनिलराव बाबर यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आहे.

शिवसेनेला खुली ऑफर, मंत्र्याने राजीनामा देताच भाजप खासदाराने केलं खळबळनक वक्तव्य

सरकारमध्ये नाराजांची वाढती संख्या

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. मात्र त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळ विस्तारच झाला नाही. तीन पक्षांनी बराच काळ चर्चेचं गुऱ्हाळ केल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र या विस्तारानंतर अद्याप या मंत्र्यांना खात्याचं वाटपच करण्यात आलेलं नाही. हे सर्व मंत्री अद्याप बिनखात्याचेच मंत्री आहेत. तसंच काही आमदार हे मंत्रिपदासाठी डावलल्याने पक्षावर नाराज आहेत.

शिवसेनेतंही नाराजीचं लोण

डॉ. तानाजी सावंत याना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज झाले असून सावंत यांना मंत्रिपद द्या, या मागणीला घेऊन जिल्ह्यातील पदाधिकारी हे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुंबईमध्ये जाऊन मातोश्री वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घालणार आहेत. सावंत यांच्यावर अनन्याय झाला असून तो पक्षांनी दूर करावी अशी मागणी शिवसैनिक करत आहेत.

शिवसेनेला मोठा दिलासा, या महिला बंडखोर उमेदवाराने घेतली माघार

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आलं आहे. सत्तार यांच्या राजीनाम्याचे बातमीने महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप झाला. मात्र शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

'अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांकडे राजीनामा दिलेला नाही,' अशी माहिती शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी खरंच राजीनामा दिला आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2020 03:42 PM IST

ताज्या बातम्या