शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यत या कट्टर शिवसैनिकाने केला 'हा' निर्धार

शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यत या कट्टर शिवसैनिकाने केला 'हा' निर्धार

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,1 नोव्हेंबर: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील शिवसैनिकही आग्रही आहेत. अनेक जणांनी यासाठी निर्धार केला आहे.सोलापूर जिल्हयातील सांगोला तालुक्यातील मुहूद गावातील शंकर मेटकरी या सच्चा शिवसैनिकाने शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी अनोखा निर्धार केला आहे.

शंकर मेटकरी हे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत. कोणत्याही पदाची आणि सत्तेची अपेक्षा न ठेवता ते गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ता आहेत. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही अपेक्षा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. तशीच शंकर मेटकरी यांची देखील आहे.

2012 पासून मेटकरी यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यत पायात चप्पल घालणार नाही, असा निर्धार शंकर मेटकरी त्यांनी केला आहे. गेल्या सात वर्षांपासून मेटकरी हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न डोळ्यात साठवून आहेत. ते अनवाणी पायांनी पक्षाचे काम करत आहेत. शंकर मेटकरी यांची घरची परिस्थिती बेताची आहे. तरीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेऊन ते प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आहेत.आजही त्यांना ना कोणत्या पदाची ना सत्तेची अपेक्षा नाही. फक्त बाळासाहेबांनी मुख्यमंत्रिपदाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे, अशीच मेटकरी यांची इच्छा आहे. एकीकडे सत्तेसाठी पक्ष बदलणारे नेते आणि दुसरीकडे पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी अनवानी पायाने चालणारा कार्यकर्ता किती विरोधाभास आहे. परंतु अशा दलबदलू आणि सत्तेसाठी कायपण करणाऱ्या नेत्यांसाठी शंकर सारख्या छोट्या कार्यकर्त्याने मोठा आदर्श निर्माण केला आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या