Home /News /maharashtra /

सोन्याचे दागिणे लुटणाऱ्या दरोडेखोरांचा गेळीबार, तरुण ठार

सोन्याचे दागिणे लुटणाऱ्या दरोडेखोरांचा गेळीबार, तरुण ठार

गाडीतील सोनं आणि दागिने ठेवलेली बॅग पळवून नेत असताना तिथून जात असलेला अविनाश शर्मा यांच्यावर गोळी झाडलीय.

हरिष दिमोटे, शिर्डी 6 फेब्रुवारी : सोनाराला लुटताना दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडालीय. या गोळीबारात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झालाय. संगमनेर शहराजवळील घुलेवाडी परीसरात हा थरार बुधवारी संध्याकाळी घडलाय. कारमधून आलेल्या चौघांनी सोनार ज्ञानेश्वर चिंतामणी यांच्या गाडीची तोडफोड केली या दरम्यान मदतीसाठी धावलेल्या युवकावर चोरट्यांनी गोळीबार केला यात त्याचा मृत्यू झालाय.  संगमनेर शहरा जवळील घुलेवाडी शिवारातील सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी आपलं कामकाज आवरून घरी परतल्यावर घराजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करीत गाडीच्या काचा फोडल्या व गोळीबार केला. गाडीतील बॅग पळवून नेत असताना तिथून जात असलेला अविनाश शर्मा यांच्यावर गोळी झाडलीय. या घटनेत जखमी झालेल्या अविनाश शर्मा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याची धमकी ही घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावच्या शिवारातील आदर्श नगर येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून काही पथके रवाना झाली आहेत.

पवारांना टार्गेट करणारा भाजपचा नेता शिवसेनेच्या संपर्कात? CM ठाकरेंची घेतली भेट

या भागात गेल्या काही महिन्यांमध्ये चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. शिर्डी आणि परीसरात पर्यटकांची संख्या जास्त असते. त्यामुळे पोलिसही विशेष काळजी घेत असतात मात्र गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ कमी झालेली नाही.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Firing, Shirdi

पुढील बातम्या