मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्यापासून शिर्डी बेमुदत बंद, मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत माघार नाही

उद्यापासून शिर्डी बेमुदत बंद, मुख्यमंत्री तोडगा काढत नाहीत तोपर्यंत माघार नाही

सर्व व्यवहार बंद ठेवण्याच व्यापारी वर्गाला आवाहन. साईमंदिर मात्र सुरू राहणार आहे. साईबाबांचे भक्तनिवास आणी प्रसादालय राहणार सुरू राहणार आहे.

सर्व व्यवहार बंद ठेवण्याच व्यापारी वर्गाला आवाहन. साईमंदिर मात्र सुरू राहणार आहे. साईबाबांचे भक्तनिवास आणी प्रसादालय राहणार सुरू राहणार आहे.

सर्व व्यवहार बंद ठेवण्याच व्यापारी वर्गाला आवाहन. साईमंदिर मात्र सुरू राहणार आहे. साईबाबांचे भक्तनिवास आणी प्रसादालय राहणार सुरू राहणार आहे.

  शिर्डी 18 जानेवारी : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद चिघळला आहे. बाबांचं जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी असल्याने त्याच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्या विरोधात शिर्डीकर एकवटले आहेत. पाथरी हे जन्मस्थळ असल्याचा पुरावा कुठेही उपलब्ध नाही त्यामुळे सरकारने ही घोषणा मागे घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्या विरोधात हा बंद असून शनिवारी मध्यरात्री 12 पासून हा बंद सुरू होईल. जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठोस घोषणा करत नाही तोपर्यंत बंद घेणार नाही अशी घोषणा ग्रामसभेत करण्यात आलीय. शनिवारी रात्री 12 पासूनच बेमुदत बंदला प्रारंभ होणार आहे. शिर्डीच्या ग्रामसभेत घोषणा करण्यात आलीय. मुख्यमंत्री जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहणार आहे. सर्व व्यवहार बंद ठेवण्याच व्यापारी वर्गाला आवाहन. साईमंदिर मात्र सुरू राहणार आहे. साईबाबांचे भक्तनिवास आणी प्रसादालय राहणार सुरू राहणार आहे. पाथरीचा विकास जन्मभुमी म्हणून करू नये. शिर्डीच्या ग्रामस्थांची भूमिका. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना, साईबाबाचं जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचं लवकरच भूमिपूजन केलं जाईल अशी घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिर्डीत नाराजी पसरली. साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेलं असतानाही जन्मस्थानाविषयी दावे केले जातात. हे सर्व प्रकार निंदणीय असल्याचं शिर्डीतल्या नागरिकांनी सांगितलं. ...म्हणून मी 4 वेळा उपमुख्यमंत्री झालो, बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला.

  राजकारणात कही 'पे निगाहे, कही पे निशाणा' ठेवावा लागतो - उद्धव ठाकरे

  साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Shirdi sai baba sansthan

  पुढील बातम्या