शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत 20 डिसेंबरपासून 'शरदोत्सव'

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत 20 डिसेंबरपासून 'शरदोत्सव'

शरदोत्सवामध्ये शुक्रवारी (20 डिसेंबर) महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम...

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,18 डिसेंबर:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पंढरपूरमध्ये 'शरदोत्सव 2019'चे आयोजन करण्यात आले आहे. 'शरदोत्सव 2019'ला 20 डिसेंबरला प्रारंभ होणार असून 25 डिसेंबरला सांगता होणार आहे. सर्व कार्यक्रम येथील संत तनपुरे महाराज मठात सायंकाळी सहा ते दहा या वेळेत होणार आहेत.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा तसेच शारदाई पुरस्कार वितरण व बक्षीस समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व संयोजक श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा युवक सचिव सूरज पेंडाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शरदोत्सवामध्ये शुक्रवारी (20 डिसेंबर) महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे उद्घाटन प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे समन्वयक अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शनिवार 21 रोजी राज्यस्तरी नृत्य स्पर्धा होत असून याचे उद्घाटन विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके यांच्या उपस्थितीत होणार आहे. रविवार 22 रोजी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सातारा रा.यु.कॉं.जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, उपस्थितीत होणार आहे.

सोमवारी (23 डिसेंबर) रोजी मी अनुभवलेले साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्या हस्ते व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या अध्यतेखाली होणार आहे. बुधवारी (25 डिसेंबर) रोजी शारदाई पुरस्कार वितरण व बक्षीस समारंभ राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 18, 2019, 3:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading