...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

' इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे.'

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 03:17 PM IST

...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

हरिष दिमोटे, श्रीरामपूर 30 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनीक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. आणि टीका करतानाही त्यांचा तोल कधी जात नाही. मात्र आज श्रीरामपूर इथं एका कार्यक्रमासाठी आलेले पवार पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफीचीही मागणी केली. ज्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाताहेत त्याच संदर्भातला एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

राष्ट्रवादीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असेलेल नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला.

VIDEO : बीडमध्ये राजकारण तापलं, पंकजा मुंडेंची अजित पवारांवर जहरी टीका

नातेवाईकांच्या प्रश्न शरद पवारांना आवडला नाही. त्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. इथे नात्याचा तुम्हा प्रश्न का विचारला असा प्रश्न त्यांनी केला. इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे असं त्यांनी सुनावले आणि मी पत्रकार परिषद सोडून जातो असं ते म्हणाले. जेव्हा सगळ्यांनी त्यांना बसण्याची विनंती केली तेव्हा ते शांत झाले.

Loading...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्याबद्दलचा तो प्रश्न होता. पद्मसिंह पाटील हे पवारांचे अतिशय जवळचे सहकारी समजले जातात. आणि ते त्यांचे नातेवाईकही आहेत. त्यामुळे पवार यांचा पारा चढला.

'माझं काही चुकलंय का याचा मी शोध मी घेतोय'

दोन दिग्गज नेत्यांनी सोडली होती शिवसेना, आता एक शिवसेना तर दुसरा जाणार भाजपमध्ये

पत्रकार परिषदेत पवारा म्हणाले, राजकारणात अनेक जण येतात आणी जातात. कुटुंबातल्या घटकालाही राजकीय भुमिका असते. कुटुंबातले असले तरी राजकीय भूमिका वेगळी असू शकते. यापुर्वीही मला अनेकजण सोडून गेले होते. मात्र आत्मविश्वासाने पुन्हा जागा निवडून आणल्या. जे सोडून जाताहेत त्यांना शुभेच्छा. माझं काही चुकलंय का याचा मी शोध मी घेतोय. आमचं काही चुकलं असं कुणाच्याही बोलण्यात आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...