धक्कादायक: मोबाईलमध्ये गेम खेळायला देतो सांगून दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
धक्कादायक: मोबाईलमध्ये गेम खेळायला देतो सांगून दोन मुलांवर लैंगिक अत्याचार
आरोपी असलेल्या दोन मुलांचं वय हे16 आणि 17 वर्ष आहे तर पीडित मुलांचं वय हे 9 आणि 10 वर्षाचं आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले आहेत.
सातारा 04 डिसेंबर: कोरोनामुळे लागू झालेलं लॉकडाऊन त्यामुळे शाळा बंद असून मुलांचं Online शिक्षण सुरू आहे. मात्र यातूनच काही काही गैरप्रकार घडून येत असल्याचं पुढे आलं आहे. फलटणमध्ये काही मुलांनी दुसऱ्या मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी आणि पीडित हे दोघेही अल्पवयीन असल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मोबाईलवर गेम दाखवतो असं सांगत अल्पवयीन मुलावर लैंगीक अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार फलटण मध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. फलटण शहरातील पीडित मुलांच्या शेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी पीडित मुलांच्या घरी कोणी नसताना हा सर्व प्रकार केल्याचं उघड झालं आहे.
या संदर्भात पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांवर अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने मोबाईल वर ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. मुलांच्या हातांमध्ये मोबाईल आहेत त्याचाच गैरफायदा घेत हा प्रकर घडला.
आरोपी मुलांनी शेजारच्या मुलांच्या घरी जात त्यांना मोबाईलवर गेम खेळण्यास देतो असं सांगत अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलांनी नंतर आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पालकांनाही धक्का बसला.
हॅक होता होता वाचलं स्वप्नील जोशीचं Instagram; चाहत्यांना अलर्ट करणारा VIDEO
आरोपी असलेल्या दोन मुलांचं वय हे16 आणि 17 वर्ष आहे तर पीडित मुलांचं वय हे 9 आणि 10 वर्षाचं आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी पालकांनी मुलांना मोबाईल घेऊन दिले आहेत. मात्र त्यावर मुलं काय करतात याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. सोशल मीडिया आणि स्वस्त झालेलं इंटरनेट यामुळे मुलं नको असलेल्या गोष्टी करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं आहे.
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून त्यांना वेळो वेळी सावध केलं पाहिजे असं मतही व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.