सेक्स रॅकेटचा भंडाफोड, फार्महाऊसवर आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या तरुणी

सेक्स रॅकेटचा भंडाफोड, फार्महाऊसवर आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या तरुणी

पन्हाळा, ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती कोल्हापूरच्या पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती.

  • Share this:

कोल्हापूर,27 सप्टेंबर:कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकाने एका फार्महाऊसवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर छापा टाकून देहविक्रीसाठी आणलेल्या चार तरुणी व दोन एजेंटला पोलिसांनी अटक केली आहे.

पन्हाळा, ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेवाडी येथील आर.जे. फार्महाऊसवर वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती कोल्हापूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (पिटा) पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळा काही तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी फार्महाऊसचा मालक महेश श्रीकांत कदम आणि गणेश बाबासाहेब जगदाळे या दोघांसह चार तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टाटा सुमो, मोटारसायकल, दोन मोबाइल अस दोन लाख रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पीडित तरुणींची कोल्हापूर येथील तेजस्विनी महिला सुधारगृहात तर दोन्ही आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलिसांच्या विशेष पथकात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंद कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, कॉन्स्टेबल ए.एस. पाटील, एम. बी. पाटील, ए. आर. पाटील, एम. एस. घोडके, जे. ए. पाटील, एस.एम. लाड यांनी ही कारवाई केली आहे.

ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या