7 वर्षांचा विक्रमवीर केदार, कोल्हापूरच्या पोराचे सायक्लोथॉनमध्ये 4 विक्रम

7 वर्षांचा विक्रमवीर केदार, कोल्हापूरच्या पोराचे सायक्लोथॉनमध्ये 4 विक्रम

कोल्हापूरच्या सात वर्षीय केदार साळुंखे याने कोल्हापुरातील सायक्लोथॉनमध्ये 4 विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 19 फेब्रुवारी - कोल्हापूरच्या रमणनमळा इथल्या 7 वर्षांच्या केदार साळुंखेनं एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. कोल्हापूरमध्ये झालेल्या सायक्लोथॉनचं 45 किमीचं अंतर केदारने अवघ्या 79 मिनिटांमध्ये पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहेत. कोल्हापुरात शिवजयंतीनिमित्त "STOP VIOLENCE AGAINAST WOMEN" (महिलांवरील अत्याचार थांबवा)हा संदेश देण्यासाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. उजळाईवाडी पासून सुरू झालेली ही स्पर्धा तावडे हॉटेल, सांगली फाटा, शिरोली, वाठार, किणी टोलनाका आणि कसबा बावडामार्गे परत पोलीस अधीक्षक चौक असं 45 किमीचं हा सायक्लोथॉनचा मार्ग होता. हे अंतर पूर्ण करण्याचा कालावधी होता 105 मिनिटांचा मात्र 7 वर्षांच्या केदारने हे अंतर केवळ 79 मिनिटंमध्येच पूर्ण करून सगळ्यांना अचंबित केलं आहे. केदारच्या या विक्रमाची चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड(ग्लोबल)मध्ये झाली आहे. याच स्पर्धेत त्याने 4 विश्वविक्रमांची नोंद केली आहे.

एकाच स्पर्धेत 4 विक्रम करणारा तो पहिलाच सायकलिस्ट ठरला आहे. यामध्ये त्याने फास्टेस्ट क्वार्टर सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट हाफ सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट फुल सायकलिंग मॅरेथॉन, फास्टेस्ट 5 किलोमीटर सायकलिंग रन यामध्ये बाजी मारत 4 विक्रम आपल्या नावावर केलेत. गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि निरीक्षक मनमोहन रावत, कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमोल कोरगावकर यांच्या हस्ते या सायक्लोथॉनला सुरुवात झाली. 45 किमीचं हे अंतर अवघ्या 79 मिनिटांमध्ये पूर्ण करून पोलीस अधीक्षक चौकात आल्यानंतर केदारचं फुलांची उधळण करून त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महापौर निलोफर आजरेकर यांनी केदारने लहान वयात विश्वविक्रम करून कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घातला आहे त्याबद्दल त्याचं कौतुक केलं. तर त्याच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छाही दिल्या आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल न्यू रेसर सायकल क्लब, जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय, लौकिक फोटो कुडित्रे यांनी त्याला सन्मान चिन्ह देऊन कौतुक केलं. यावेळी विविध संघटना आणि मान्यवरांनी त्याचा सत्कार केला. शिवजयंतीनिमित महिलांचा सन्मान राखण्याची आणि संरक्षण करण्याची शपथ घेण्यात आली.

सात वर्षांचा डॉ. केदार साळुंखे - केदार साळुंकेने एवढ्या कमी वयात अनेक विक्रमांची नोंद केली आहे. त्यातलाच एक मोठा विक्रम म्हणजे त्याने मिळवलेली डॉक्टरेट. हो तुम्हा बरोबर ऐकत आहात. केदार साळुंखे याने अॅथलेटिक्समध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. म्हणजे केदारची अॅथलेटिक्समध्ये कामगिरी किती चमकदार आणि जबरदस्त असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.

का चालली ही मुलं आगीतून? पालघरच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण

राधाकृष्ण विखे पाटील नव्या रस्त्याच्या शोधात..? संपर्क कार्यालयावरुन झेंडा गायब

 

First published: February 19, 2020, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading