दगडाने ठेचून तरुणाची हत्या, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं

दगडाने ठेचून तरुणाची हत्या, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं

वयक्तिक संघर्षातून ही हत्या झाली का याचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक वाद आणि गुंडांमधल्या वर्चस्वाचा संघर्ष यातून ही हत्या झाल्याचा अंदाजही व्यक्त होतोय.

  • Share this:

रायचंद शिंदे, शिरूर 28 ऑगस्ट : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे दगडाने ठेचून  एका तरूणाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. या घटनेनं परिसरात खळबळ उडालीय.  रुपेश जगतराव वाल्हे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. आज सकाळी नदीपात्रात रूपेश चा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शिक्रापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. रूपेशवर पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिलीय. मात्र या हत्येचं नेमकं कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.

वयक्तिक संघर्षातून ही हत्या झाली का याचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक वाद आणि गुंडांमधल्या वर्चस्वाचा संघर्ष यातून ही हत्या झाल्याचा अंदाजही व्यक्त होतोय. घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी एक खास टीम तयार केलीय.

200 गुंडांना करणार हद्दपार

महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या काळात लाखो लोक एकत्र येतात. महाउत्सव साजरा होतो. या काळात सामाजिक शांतता राखणं हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. ही शांतता टिकवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी गुंड आणि तथाकथीत दादांच्या टोळ्यांना जबर हादरा दिलाय. पोलिसांनी 200 गुंडांना तडीपार करण्याचा निर्णय घेतलाय. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्यानं गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

VIDEO: मुंडे बहीण-भावाला डावलून वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा

गणेशोत्सवापासून उत्सवांना सुरूवात होते. गणेशोत्सव, गौरी, नंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी असा उत्सवांचा धडाका असतो. या काळात पोलिस खास खबरदारी घेत असतात. याचाच आधार घेत कोल्हापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. रेकॉर्डवरच्या विविध गँगच्या 200 गुंडांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकाळात प्रतिबंध घातलेल्या परिसरात वास्तव्य केलं तर पोलीस कडक कारवाई करणार आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंचा खुलासा म्हणाले...पाहा VIDEO

पोलिसांच्या रेकॉर्डवर अशा अनेक नामचीन गुंडांची नावं असून पोलिसांना त्यांचा सगळा कळा इतिहास माहित आहेत. त्या आधारे पोलिसांनी 200 जणांची यादी तयार केलीय. खून, दरोडे, बलात्कार, लूटमार, दंगल, अपहरण, सामाजिक शांतता बिघडवणं, अवैध शस्त्र बाळगणं अशा अनेक गुन्ह्यांची नोंद या गुंडांच्या नावावर असून अनेकदा त्यांनी जेलची वारीही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading