• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • '...तर ऊर्जा मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही'

'...तर ऊर्जा मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही'

Nagpur: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray along with party MLAs addresses a press conference during the second day of the Winter Session of the State Assembly, at Vidhan Bhawan, in Nagpur, Tuesday, Dec. 17, 2019. (PTI Photo)  (PTI12_17_2019_000139B)

Nagpur: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray along with party MLAs addresses a press conference during the second day of the Winter Session of the State Assembly, at Vidhan Bhawan, in Nagpur, Tuesday, Dec. 17, 2019. (PTI Photo) (PTI12_17_2019_000139B)

'सरकार जर ऐकणार नसेल तर सरकारला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल आणि सरकारला ते ऐकावच लागेल.'

  • Share this:
कोल्हापूर 25 डिसेंबर : ज्येष्ठ शेकाप नेते एन. डी पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पाटील यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर थेट सरकारलाच आव्हान दिलं असून आंदोलनाचा इशारा दिलाय. सरकारने 10 जानेवारीपर्यंत शेती पंपाच्या बिलाचा गोंधळ सोडवावा अन्यथा 10 जानेवारी नंतर आम्ही ऊर्जा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जेष्ठ नेते एन डी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये सरकारला दिलाय. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या महापुरग्रस्त शेतकरी मेळाव्यात ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील बोलत होते.  जी वीज आम्ही वापरली नाही, त्या विजेचं आम्ही बील भरणार नाही. आम्ही वीज वापरली नाही त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही वीज वापरली असं तुमचं म्हणणं असेल तर पुरावा द्या असं आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला दिलंय. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शेतकरी स्वाभीमान संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकार जर ऐकणार नसेल तर सरकारला वेगळ्या भाषेत सांगावं लागेल असा देखील इशारा दिलाय. राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं तर सरकारला अडचण होऊ शकते. पुण्यात काय म्हणाले उद्धव ठाकरे? आज जर काही चुकीचं बोललो तर त्याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र आणि ज्यांनी ही जबाबदारी घ्यायचा आदेश दिला मला दिला ते पवार साहेब असतील,' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात सत्तेस्थापनेविषयी भाष्य केलं आहे. तसंच साखर कारखानदारी आणि शरद पवार यांचं राजकारण याबाबतही गमतीशीर भाष्य केलं आहे.

राणेंच्या पैशाला खुनाचा वास तर शिवसेनेचा नेता श्वान परंपरेतला, कोकण पुन्हा तापलं

'इथे कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे पवार साहेब शिकवतात. तर दुसरीकडे कमी आमदारांच्या जागेत सरकार कसं बनवायचं हेही त्यांनी शिकवलं,' असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची तोंडभरून स्तुती केली. तसंच आमच्याकडे जास्त जागा म्हणून कुणी ओरडू नये, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published: