झालं ठरलं! काँग्रेसला बसणार हादरा, हा दिग्गज नेता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

झालं ठरलं! काँग्रेसला बसणार हादरा, हा दिग्गज नेता उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

'राष्ट्रवादीचे उमेदवार मग ते शरद पवार असो वा सुप्रिया यांची प्रामाणिकपणे कामं केली, आघाडी धर्म पाळला. बदल्यात मात्र आपल्यावर अन्याय झाला, अपमान वाट्याला आला, राजकीय कोंडी केली गेली.'

  • Share this:

मधुकर गलांडे, इंदापूर 10 सप्टेंबर :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. पाटील उद्या 11 सप्टेबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेसपक्षासाठी मोठा हादरा मानला जातोय. काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला होता. तर काँग्रेस पक्षाच्याच नेत्यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडलं असाही आरोप त्यांनी केला होता. उद्या गरवारे क्लबमध्ये हा कार्यक्रम होणार असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अनेक मान्यवर   उपस्थित राहणार आहेत. राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते आहेत. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे ते 4 वेळा आमदार होते. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात त्यांनी 5 वर्षे मंत्री म्हणून काम.

'भाजपमध्ये जाणारी 'मुलं' वडिलांना दुसऱ्याच्या दारात नेऊन मुजरा करायला लावतात'

त्यानंतर आघाडी शासनातही 14 वर्षे त्यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केलं. एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं. उत्कृष्ट संसदीय कार्यमंत्री म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते  त्यांचा गौरव करण्यात आला होता. इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नव्हती. त्यामुळे 2014 सारखच कोंडीत पकडलं जाईल असं त्यांना वाटत होतं.

इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली होती भाजप प्रवेशाची मागणी. पाटील हे इंदापूर विधानसभेची जागा भाजप कडून लढविण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारी बातमी; MIMने वंचितला दिला 'तलाक'

काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील?

हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला झालेल्या इंदापूरातल्या मेळाव्यात एकदाचे आपल्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यांनी त्यांचा भाजपकडे जायचा कल आहे हे सूचकपणे सांगितले आणि जनसंकल्प मेळाव्याला उपस्थित इंदापूरकरांनीही भाजप, भाजप, कमळ, कमळ म्हणत तोच कौल दिला. अर्थात 10 सप्टेंबरच्या आसपास आपण काँग्रेस सोडून कुठं जाणार याचा अंतिम निर्णय घेऊ म्हणत त्यांनी थोडी संदिग्धता ठेवलीय.

आपले चुलते बाजीराव पाटील यांना लोकसभेचे तिकीट नाकारून अजित पवारांना दिले. तेव्हापासून आपण प्रामाणिकपणे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार मग ते शरद पवार असो वा सुप्रिया सुळे यांची प्रामाणिकपणे कामं केलीत, आघाडीचा धर्म पाळला. बदल्यात मात्र आपल्यावर अन्याय झाला, अपमान वाट्याला आला, राजकीय कोंडी केली गेली आणि राष्ट्रवादीने सगळा विचका केला म्हणत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या तिघांवर दगाबाजी, विश्वासघात केल्याचे आरोप केले.

शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा विरोध असतानाही आपण  सुप्रिया सुळेंना इंदापुरातून 72 हजार मतांचे लीड मिळवून दिले मात्र शिवस्वराज्य यात्रा मुद्दाम इंदापुरात काढून, दत्तात्रय भरणे या विद्यमान आमदारालाच तिकीट दिलं जाईल असे संकेत देत जखमेवर मीठ चोळले गेले अशी  व्यथा त्यांनी मांडली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 10, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading