पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का, काँग्रेसचाच 'हा' नेता देणार त्यांना टक्कर

पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का, काँग्रेसचाच 'हा' नेता देणार त्यांना टक्कर

पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना टक्कर द्यावी अशी योजना होती मात्र चव्हाण त्यासाठी तयार नव्हते.

  • Share this:

मुंबई 01 ऑक्टोंबर : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय. कराड उत्तरमधील काँग्रेसचे खंदे समर्थक धैर्यशील कदम यांनी उदयनराजे यांचं समर्थन करत शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. कदम यांना कराड उत्तर मधून शिवसेनेची उमेदवारीही मिळवलीय. यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस ला मोठा धक्का मानला जातोय. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत धैर्यशील कदम हे कराड उत्तर मधून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 58 हजार मतं मिळाली होती.  उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादीला झोंबल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार देण्यासाठी रणनीती आखली होती.

उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप अडचणीत, 'या' जागांवर बंडखोरीची शक्यता

उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना मैदानात उतरविण्याची चर्चाही जोरदार होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीने माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली.

उत्तर महाराष्ट्रातही काँग्रेसला खिंडार

ऐन विधानसभा निवडणुकांत्या तोंडावर नंदूरबारमधून काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. उत्तर महाराष्ट्रमधील काँग्रेसचे बडे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी सेनेच्या वाटेवर आहेत. गांधी परिवाराशी एकनिष्ठ कुटूंब म्हणून रघुवंशी परिवाराची ओळख आहे. गेल्या तीन टर्मपासून चंद्रकांत रघुवंशी विधानपरिषद आमदार हे बुधवारी दुपारी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

भाजप उडवणार प्रचाराचा धुराळा, मोदी आणि शहांचा असा आहे 'मेगा प्लान'

29 सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये 4 जागांपैकी नंदूरबारच्या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यात चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीचं चित्र स्पष्ट नसल्यामुळे ते शिवबंधन हाती बांधणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत रघुवंशी हे  शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. पण यासंबंधी त्यांना विचारलं असता अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.

...तर शिवसेनेला धडा शिकविणार, भाजप खासदाराची थेट धमकी

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात काँग्रेसकडून 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पण त्यात नंदूरबार मतदार संघाचं नाव नव्हतं. त्यामुळे नंदूरबार मतदार संघातून काँग्रेसला मोठं खिंडार पडू शकतं अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 1, 2019, 8:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading