सिगारेट दिली नाही म्हणून पेटवली कार, परप्रांतियांकडून सांगलीत दुकानदारावर हल्ला

सिगारेट दिली नाही म्हणून पेटवली कार, परप्रांतियांकडून सांगलीत दुकानदारावर हल्ला

परप्रांतिय कामगारांच्या जमावाने किराणा मालाच्या दुकानाची तोडफोड करत दुकानदारावर हल्लाही केला.

  • Share this:

सांगली, 09 मे : सिगारेट दिली नाही म्हणून परप्रांतीय कामगारांनी दुकानदाराची चारचाकी गाडीच पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील पाटगाव इथं हा प्रकार घडला आहे. परप्रांतिय कामगारांच्या जमावाने किराणा मालाच्या दुकानाची तोडफोड करत हल्लाही केला. यानंतर जमावाने तीन मोटारसायकलींची तोडफोड़ केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परप्रांतिय कामगार रात्री दुकानात आले. त्यांनी सिगारेटची मागणी दुकानदाराकड़े केली. दुकानदाराने सिगारेट नाही असं सांगितल्यानं चिडलेल्या परप्रांतिय कामगारांनी दुकानावरच हल्ला केला. यामध्ये दुकानातील मालाचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन परप्रांतियांना ताब्यात घेतलं आहे. तसंच सात जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व कामगार हे दिलीप बिडकोन कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचा : धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या, नवव्या मजल्यावरुन घेतली उडी

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत. कन्हैयाकुमार आणि रुपेंद्रसिंग तोमर अशी त्यांची नावे आहेत. दिलीप बिडकोन रोड कन्स्ट्रक्शन वर्क या कंपनीत दोघेही काम करतात.

हे वाचा : पुण्यात खळबळजनक घटना, भांडणात बापाने केला 5 महिन्याच्या मुलीचा खून

First published: May 9, 2020, 4:50 PM IST
Tags: sangli

ताज्या बातम्या