तुम्ही मांसाहारी बकरी पाहिली का? नाही ना, तर पहा, अंडी खाऊन जगणारी ही बकरी

तुम्ही मांसाहारी बकरी पाहिली का? नाही ना,  तर पहा, अंडी खाऊन जगणारी ही बकरी

बकरी शाकाहारी आहे की मांसाहरी हा प्रश्न आता निर्माण झाला. कारण सांगलीतील एक बकरी चक्क अंडी खाऊन जगते.

  • Share this:

सांगली, 9 जानेवारी: बकरी म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते एक शांत अशा पाळीव प्राण्याची प्रतिमा. बकरी झाडाचा पाला-पोचोळा खाते. तुम्ही अनेकदा बकरीला चारा खाताना पाहिलंही असेल.कधी तर तुम्ही बकरीला झाडाचा पालाही खायला दिला असेल. मात्र बकरी अंडी खात असेल तर... तुमचा विश्वास बसणार नाहीपण सांगलीत चक्क बकरी अंडी खाते.

तसं पाहिलं तर झाडांचा पाला-पाचोळा खाऊन जगणारी बकरी सर्वांच्याच फायद्याची आहे.कारण बकरीच्या दूधात औषधी गुणधर्म आहे. त्यामुळं बकरीच्या दूधाला चांगली मागणी आहे. तसेच बकरीचं मटणही देशभरात आवडणी खाल्ल जातं. ऐवढचं नाही तर बकरी शाकाहारी असल्याचंही मानलं जातं.मात्र बकरी शाकाहारी नसल्याचं आता समोर आलं. कारण बकरी चक्क अंडी खात असल्याचं समोर आलं. एक नव्हे दोन नव्हे तर अनेक अंडी बकरी खात असल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळं बकरी शाकाहारी नाही तर मांसाहारी असल्याची चर्चा सुरू झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाकाहरी बकरी मांसाहारी कशी झाली त्याचं नेमकं कारण काही सांगता येत नाही. मात्र बकरी अंडी खात असल्याचं वास्तव समोर आलं. तसा व्हिडीओच समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होतं. सांगली जिल्ह्यातील वाझर गावात बकरी अंडी खात असल्याचा व्हिडीओ समोर आला. 

दत्तात्रय जाधव यांच्या फार्महाऊसमधील बकरी अंडी खाते.जाधव यांच्या बकरीच्या शेडच्या बाजुला ठेवलेली अंडी काही दिवसांपासून गायब होत होती. अंडी कोण नेतं याचा शोध लागत नव्हता. अनेक दिवस हाच प्रकार सुरू होता. त्यामुळं वैतागलेल्या जाधव यांनी अंडी गायब का होतात. या कारणांचा शोध घेण्याचं ठरवलं.त्यासाठी त्यांनी अंडी ठेवलेल्या जागेवर नजर ठेवली.  त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं.कारण अंड्याच्या बाजुला असलेली बकरीचं अंडी फस्त करत असल्याचं समोर आलं. एका मागून एक बकरी अंडी खात असल्याचं जाधव यांच्या लक्षात आलं. आणि अंडी गायब कुठे होतात याचा खुलासा झाला. शेडमधील बकरीच अंडी खात असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नियमीत बकरीला अंडी देण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या शेडमधील ही बकरी आता रोज अंडी खाते. बकरीचा मालकही तिला रोज न चुकता अंडी खायला घालतो. बकरी अंडी खात असल्याचं पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला. अंडी खात असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरलं झाला. त्यानंतर सर्वांनी अंडी खाणाऱ्या बकरीचा शोध घेतला. जाधव यांच्या शेतात जावून सर्वांनी अंडी खाणारी बकरी पाहिली. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही जाहीरत तुम्ही पाहिली आणि ऐकली असेलच. या जाहिराती प्रमाणेच बकरी संडे हो या मंडे रोज अंडी खाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2020 03:29 PM IST

ताज्या बातम्या