सांगली: कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा

सांगली: कोरोना रुग्णाची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या, धारधार शस्त्राने कापला गळा

त्यांना मिरज शासकीय रुग्णालयातल्या कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेले 10 दिवस उपचार सुरू होते.

  • Share this:

सांगली 28 सप्टेंबर: सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांने गळ्यावर धारधार चाकूने वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तर नातेवाईकांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. हुसेन बाबूमिया मोमीन असं पीडित रुग्णाचं नाव आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला असून हॉस्पिटलमधल्या व्यवस्थेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

मोमीन हे अमन नगर मालगाव रोड मिरज इथं राहत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयातल्या कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेले 10 दिवस उपचार सुरू  होते. रात्रीच्या सुमारास त्याचा मुलगा मुस्तफा याला रुग्णालयातून फोन आला. त्याच्या वडिलांनी गळ्यावर धारदार चाकूने वर करून आत्महत्या केली आहे असं त्यांना सांगण्यात आलं.

या घटनेनंतर हुसेन मोमीन यांच्या नातेवाईकांनी मिरज शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र ही आत्महत्या आहे की घातपात अशी शंका उपस्थित करून या घटनेची चौकशी करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे 'या' आजाराची लक्षणं

दरम्यान,  देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सप्टेंबर अखेरीला कमी आढळून येत आहेत. 93 ते 97 हजाराच्या आकड्यावरून आता जवळपास 90 च्या अलिकडे आली असल्यानं दिलासा देणारी गोष्ट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 88 हजार 600 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 124 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा 59 लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे.

सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू? आज जारी होऊ शकतात Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स

भारतात सध्या 9 लाख 56 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 49 लाख 41 हजार 628 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 94 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ब्राझिलच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढत आहेत. अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 2:49 PM IST
Tags: covid19

ताज्या बातम्या