मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सांगली बंद' शिवसेने विरोधात नाही, भिडे गुरुजींची उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती

'सांगली बंद' शिवसेने विरोधात नाही, भिडे गुरुजींची उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती

संजय राऊतांनी यांनी ठिणगीला पाय लावला आहे. संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे.

संजय राऊतांनी यांनी ठिणगीला पाय लावला आहे. संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे.

संजय राऊतांनी यांनी ठिणगीला पाय लावला आहे. संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे.

    सांगली,17 जानेवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी 'सांगली बंद'ची हाक दिली आहे. भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. उदयनराजेंचा अपमान सहन करणार नाही, भिडे गुरुजींची उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती केली आहे. सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर संगीता खोत आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. बंद काळात कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये, असे आवाहनही भिडे गुरुजींनी केले आहे. तर शिवसेनेवर बदनामीची वेळ.. संजय राऊतांनी यांनी ठिणगीला पाय लावला आहे. संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाजूला करावे. समाजाचे स्वास्थ बिघडवू नये. शिवसेना याचा अर्थ छत्रपती परंपरेचा चालू असलेला जो श्वासोच्छ्वास आहे. ते लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुखांना विनंती करतो की, त्यांनी संजय राऊत यांना आवरावं. शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, असे भिडे गुरुजी यांनी यावेळी सांगितले. शिवसेना ही संपूर्ण देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, हिंदूराष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर शिवसेना ही अत्यंत गरजेची आहे. अन्न, पाणी, वायू, सूर्यप्रकाश हे जीवन जगण्यासाठी लागतो. तशी शिवसेना आहे. तर माझी कळकळीची प्रार्थना आहे, उद्धवरावांना, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’ असं आवाहनही संभाजी भिडेंनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर तुलना करणे चुकीचे आहे. गोयल यांनी चुकीचे केले आहे. तसेच आजचा बंद हा शिवसेना विरोधात नाही.. शिवसेना मोठी व्हावी, असे मत असल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी करावी हे ज्याचं त्यानं ठरवावं, मात्र वागताना बोलताना तारतम्य बाळगावं, असा टोलाही भिडे गुरुजींनी संजय राऊतांना लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत याचे पुरावे द्यावे असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या शिवप्रतिष्ठानतर्फे सांगली बंद पुकारण्यात आला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Sambhaji bhide guruji, Shivaji maharaj

    पुढील बातम्या