संजय राऊतांची हकालपट्टी करा, उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना भिडे गुरुजींची 'सांगली बंद'ची हाक

संजय राऊतांची हकालपट्टी करा, उद्धव ठाकरे दौऱ्यावर असताना भिडे गुरुजींची 'सांगली बंद'ची हाक

'संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीन त्यांच्यावर कारवाई करावी.'

  • Share this:

सांगली 17 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी इस्लामपूरला एका कार्यक्रमासाठी येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात येत असताना शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष भिडे गुरूजी यांनी सांगली बंदची हाक दिली आहे. भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. हे वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. या विरोधात सर्व सांगली जिल्हा 17 जानेवारीला बंद राहणार आहे. संजय राऊतांनी माफी न मागितल्यास सर्व महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी तातडीन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

भिडे गुरुजी यांच्या या आवाहनानंतर हे आंदोलन आणखी चिघळणार अशी शक्यता आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांवर टीका केलीय. शिवसेनेला सत्तेचा अहंकार झाला असून त्या अहंकारातूनच हे वक्तव्य करण्यात आलंय. त्यांनी तातडीने यासाठी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणीही फडणवीस यांनी केलीय.

संजय राऊत यांचा इशारा

भाजपच्या गोयल यांनी जेव्हा शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदींची तुलना केली होती तेव्हा बंद का पुकारला नाही असा सवाल त्यांनी भिडे यांना केलाय.

CAA, NRC विरोधात प्रकाश आंबेडकरांची 'महाराष्ट्र बंद'ची हाक

उदयनराजे यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात, अशा शब्दांत राऊत यांनी उदयनराजे यांना सज्जड इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या एका कार्यक्रमात मुलाखतीनंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अमिर खान म्हणतो, चार दिवस बारामतीत मला मुक्कामाला यायचं

संजय राऊत म्हणाले, उदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही उत्तर देण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावे लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगड्या तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगड्या सगळ्यांना आहेत. मोदींनाही लोक प्रश्न विचारतात. राष्ट्रपतींनाही लोक प्रश्न विचारतात.

माझ्या निवृत्तीचा अनेकांचा प्लॅन होता पण..., शरद पवारांचा फडणवीसांना टोला

ही लोकशाही आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्याची भाषा बोलू नये. तुम्ही राजकारणाबाहेर असतात तर चालले असते. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज आहोत. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज असल्याचे संजय राऊत यांना सांगितले.

First published: January 16, 2020, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading