सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट!

सुरक्षेची हमी देण्यासाठी ‘सलून’वाल्याने केली भन्नाट आयडिया, पाहून तुम्ही पडाल चाट!

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे.

  • Share this:

सांगली 09 मे: लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद आहेत. आता काही अटींवर स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवे बरोबरच इतरही काही जणांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने ग्राहक दुकानांमध्ये फारसे फिरकताना दिसत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून आणि ग्राहकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी सांगितल्या एका सलूनवाल्याने एक भन्नाट आयडिया केलाय. त्याने आपल्या दुकानातल्या सगळ्या मुलांना पीपीई किट दिली आहे. आता ते सर्व जण ही किट घालूनच केस कापत आहेत.

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून ने केला आहे. PPE किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे. या सलून चालकाची चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे.

सांगलीच्या सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे रविज सलून आहे. ते गेल्या सहा वर्षांपासून या धंद्यात आहेत. मात्र कोरोना मुळे गेली काही दिवस त्यांचे दुकान बंद होते. प्रशासनाने काही अटी घालत सांगलीमध्ये अनेक व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली. आणि किरण जाधव यांनी गेले दोन दिवस झाले दुकान सुरू केले आहे.

हे वाचा - काँग्रेसच्या प्रवक्त्याने केलं थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट, केली गंभीर टीका

किरण यांच्याबरोबर दुकानात ऋषिकेश या दोघांनी हटके प्रयोग केला आहे.. आपल्यालाही कोरोनाचा लागण होऊ नये आणि ग्राहक ही सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी हा प्रयोग केला. सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकाला आत प्रवेश देताना सॅनिटायजरने हाथ स्वच्छ केले जातात. आणि मगच केस कटिंग सुरू होते. त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कोतुक होत आहे.

हे वाचा - 

सोनियांच्या पत्रानंतर काही तासांमध्येच विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

VIDEO: कोरोनाच्या विळख्यात मुंबईकरांसाठी आली Good News, पहिल्यांदाच घडलं असं

 

 

First published: May 9, 2020, 11:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading