Elec-widget

बा विठ्ठला.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुबुद्धी दे, 'या' समाजाने घातलं साकडं

बा विठ्ठला.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुबुद्धी दे, 'या' समाजाने घातलं साकडं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकासआघाडीने राज्यात नवं सरकार स्थापन केले आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,29 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकासआघाडीने राज्यात नवं सरकार स्थापन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी (28 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकल मराठा समाजाचे 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुबुद्धी दे', असे विठ्ठलाला साकडं घातलं आहे. राज्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडीच्या सरकारला सुबुद्धी द्यावी, यासाठी मराठा आरक्षण समन्वय समितीच्या सदस्यांनी पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.

मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर हजारो मराठा तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अनेकदा मागणी करूनही हे गुन्हे फडणवीस सरकारने मागे घेतले नाहीत. आता या उद्धव ठाकरे सरकारने तरी मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामास तातडीने सुरूवात करावी. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. यासाठी उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाने सुबुद्धी द्यावी, असं साकडं सकल मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्यसमन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी घातलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्याच दिवसांपासून आता अशा अनेक प्रश्नांना समोर जाऊन ते सोडवावे लागतील. अन्यथा मोर्चे, आंदोलने तर अटळ आहेत, अशा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंच्या अभिनंदनाचे फलक हटवले

Loading...

दुसरीकडे, बेळगावमध्ये कर्नाटकी पोलिसांची दडपशाही पुन्हा एकदा दिसून आली आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचे तीव्र पडसाद बेळगाव शहरात उमटले आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक पोलिसांनी हटवले. कर्नाटकी पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव शहरात मराठी भाषिकांनी फलक लावले होते. धर्मवीर संभाजी चौकात लावलेले फलक पोलिसांनी हटवले. एवढेच नाही तर चंदगडच्या आमदार राजेश पाटील यांचेही फोटो जाळले. शपथ घेताना आमदार पाटील यांनी सीमावासियांचा उल्लेख केला होता. कन्नड संघटनांकडून आमदार पाटील यांच्या पोस्टर्सची होळी करण्यात आली. सेंट झेव्हियर्स शाळेसमोर आमदार पाटील यांची प्रतिमा दहन करुन पाटील यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आहे.

विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी...

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगड विधानसभा मतदारसंघातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी गुरूवारी (27 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील नागरिकांचे स्मरण करुन शपथ घेतली होती. शपथ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे, अशी मागणी केली. त्यानंतर 'जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सीमाबांधव!' अशा घोषणा दिली होती. आमदार राजेश पाटील यांच्या घोषणाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कन्नड संघटनांनामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगावातल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील यांचा फोटो जाळून त्यांचा निषेध केला आहे. बेळगावात मराठी आणि कन्नड लोक सामंजस्याने राहतात. परंतु राजेश पाटील यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com