निकालाआधीच लागले रोहित पवारांच्या विजयाचे होर्डींग्ज्

निकालाआधीच लागले रोहित पवारांच्या विजयाचे होर्डींग्ज्

रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे होर्डीग्ज् कर्जत जामखेडमध्ये लावण्यात आले आहेत.

  • Share this:

जितेंद्र जाधव,कर्जत 23 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आता काही तासच शिल्लक राहिलाय. मात्र राजकीय नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा दखल घ्यावा असा असतो. महाराष्ट्रात ज्या चुरशीच्या लढती आहेत त्यात सगळ्यांचं लक्ष लागलंय ते कर्जत-जामखेड या मतदारसंघाकडे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यात जोरदार लढत होतेय. रोहित पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर राम शिंदे यांनी या आधीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असून कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे आहे. निकालाला अवकाश असतानाच रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी होर्डीग्ज् लावून रोहित पवार यांना विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत.

निकालाआधीच भाजपची जल्लोषाची तयारी, 5000 लाडूंची ऑर्डर!

रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे होर्डीग्ज् कर्जत जामखेडमध्ये लावण्यात आले आहेत. काही कार्यकर्त्यांनी हे बोर्ड लावल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. असे फलक लावून पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास दाखवून दिल्याची चर्चा आहे. तर राम शिंदे यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जातोय.

बाहेरच्या उमेदवाराला जनता स्विकारणार नाही असा जोरदार प्रचार शिंदे यांनी केला होता. तर मी बाहेरचा नसून इथलाच आहे असा दावा रोहित पवार यांनी केलाय. आता जनता कुणाला स्विकारणार हे आता लवकरच कळणार आहे.

नरेंद्र मोदींच्या फेव्हरेट तीर्थस्थानी निकालाआधी फडणवीसांची महापूजा

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2019, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading