मुंबई, 14 ऑगस्ट : पूरग्रस्त भागात मदतीसाठी हजारो हात पुढे सरसावले असले तरी यामध्ये आपलं उखळ पांढरं करून घेणारे विकृतही समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये दूध पुरवठा करणारी व्यक्ती त्यामध्ये पुराचं पाणी मिसळताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ सांगली-कोल्हापूर भागातला मुळीच नाही, हे स्पष्ट झालं आहे. काही समाजकंटकांनी हा व्हिडिओ व्हायरल करून पूरग्रस्तांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे.